Advertisement

मुंबईकर अजिंक्य रहाणे ‘वन डे’ संघात का नाही? गांगुलीने केला निवड समितीला सवाल

गेल्या रविवारी बीसीसीआय (BCCI)च्या निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. यातील वन डे संघात अजिंक्य रहाणेचं नाव नसल्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सौरव गांगुलीने निवड समितीवर संताप व्यक्त केला.

मुंबईकर अजिंक्य रहाणे ‘वन डे’ संघात का नाही? गांगुलीने केला निवड समितीला सवाल
SHARES

गेल्या रविवारी बीसीसीआय (BCCI)च्या निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. यातील वन डे संघात अजिंक्य रहाणेचं नाव नसल्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सौरव गांगुलीने निवड समितीवर संताप व्यक्त करत चांगलेच ताशेरे ओढले आहेत. 

टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा ३ आॅगसटपासून सुरू होत आहे. यांत ३ टी २०, ३ वन डे आणि २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५ सदस्यीय निवड समितीच्या बैठकीत टीम इंडियातील सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विंडीजच्या संघाला सामोरा जाणार आहे. 

'यांना' वगळलं

कर्णधार एमएस धोनी यानं या दौऱ्यातून माघार घेतल्याचं आधीच जाहीर केल्यानं त्याची जागा ऋषभ पंत घेणार आहे. कसोटीसाठी पंत सोबत रिद्धिमान साहा याला अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून घेण्यात आलं आहे. सोबत भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय आणि टी-२० संघात न निवडता विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहला केवळ कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. 

तर, शिखर धवनला केवळ वन डे संघात घेण्यात आलं आहे. त्याला कसोटी संघात संधी मिळाली नाही. त्याच्याऐवजी चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांनी कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. तसंच मुंबईकर अजिंक्य रहाणेलाही फक्त कसोटीसाठी निवडण्यात आलं आहे. 

तरूणांना संधी

टी २० आणि वन डे संघात श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, राहुल चहर, दिपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदिप सैनी आणि खलिल अहमद यांसारख्या तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. परंतु प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल आणि अनुभवी मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणे यांचा वन डे टीममध्ये विचार करण्यात न आल्याने गांगुली वैतागला आहे.

काय म्हणाला गांगुली? 

गांगुलीने ट्विट करून निवड समितीच्या निर्णयावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या भारताकडे असे अनेक खेळाडू आहेत जे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करू शकतात. असं असूनही शुभमन संघात नाही याचं मला आश्चर्य वाटतं. रहाणे देखील एकदिवसीय सामन्यात हवा होता. निवडकर्त्यांचं मुख्य काम सर्वश्रेष्ठ उपलब्ध संघाची निवड असून लोकांना खूश करणे हे त्यांचं काम नाही. आता अशी वेळ आली आहे की निवड समितीने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि लय कायम राखण्यासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी एकाच संघाची निवड करावी, असा सल्ला गांगुलीने दिला.हेही वाचा-

इतक्यात निवृत्ती नाहीच- धोनी

‘असं’ आहे टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक, ‘या’ दिवशी होणार भारताचा पहिला सामनासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा