Advertisement

मला नाही पक्षबदलूंची चिंता, शरद पवार असं का म्हणाले?

सध्या राष्ट्रवादीचे (NCP) काही नेते पक्ष सोडून जात आहेत, त्याबद्दल मला जराही चिंता वाटत नाही. कारण याआधीही अशी परिस्थिती मी अनुभवली आहे, असं पवार म्हणाले.

मला नाही पक्षबदलूंची चिंता, शरद पवार असं का म्हणाले?
SHARES

सध्या राष्ट्रवादीचे (NCP) काही नेते पक्ष सोडून जात आहेत, त्याबद्दल मला जराही चिंता वाटत नाही. कारण याआधीही अशी परिस्थिती मी अनुभवली आहे. मात्र सध्या भाजप-शिवसेनेकडून (BJP- Shiv Sena) सत्तेचा जो गैरवापर सुरू आहे, तसा टोकाचा गैरवापर याआधीच्या कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी शरद पवार यांना पक्षबदलाबद्दल काही प्रश्न विचारले होते. त्यावर उत्तर देताना पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

 कोण गेले सोडून?

गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan sabha election) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) आणि त्यांचे पूत्र वैभव पिचड देखील राजीनामा दिल्यानंतर भाजपात सामील होतील, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा-राष्ट्रवादीला नवी मुंबईतही खिंडार, गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर?

या आधीही अशी वेळ

पवार यांची जवळची माणसं साथ सोडून जात असल्याने पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले या आधीही आमच्यासोबत असे प्रकार झाले होते. १९८० मध्ये आमचे ६० आमदार निवडून आले होत. तेव्हा मी परदेशात होतो. परदेशातून आल्यावर आमचे केवळ ६ आमदार शिल्लक होते. उर्वरित सर्व आमदार फोडण्यात आले. त्यानंतर आम्ही या ६ आमदारांचे पुन्हा ६० आमदार केले. आम्ही या सर्व परिस्थितीतून गेलाे आहोत. तेव्हा पक्ष कसा उभा करायचा हे आम्हाला चांगलं माहीत आहे. 

हेही वाचा-आमचं खत चांगलं आहे, त्यामुळं महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार- आदित्य ठाकरे

कारवाईचा धाक

परंतु केंद्र आणि राज्यातील सरकार सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना घाबरवत आहे. त्यांच्या मागे, सीबीआय (CBI) ईडी (ED) आणि प्राप्तिकर विभागाचा (Income Tax) ससेमिरा मागे लावला जात आहे. काही दिवसांपूर्वीच काेल्हापूरमधील हसन मुश्रीफांचं घर आणि कारखाना परिसरात प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. यातील काही नेते कारवाईच्या भीतीने तर काही नेते सत्ता आणि स्वार्थासाठी पक्ष सोडून जात आहेत. या पडझडीतून पक्ष पुन्हा सावरेल, असंही शरद पवार म्हणाले.   

पवार यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करताना राष्ट्रवादीतून नेते का बाहेर पडत आहे, यावर पवार यांनी आत्मचिंतन करावं, असं म्हटलं आहे. 



हेही वाचा-

आहे तिथेच राहा! भुजबळांविरोधात शिवसैनिकांचे बॅनर

प्रवाहाविरोधात लढण्याची हिंमत नव्हती म्हणून अहिर गेले- नवाब मलिक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा