Advertisement

आमचं खत चांगलं आहे, त्यामुळं महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार- आदित्य ठाकरे

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शरद पवारांच्या या वक्तव्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

आमचं खत चांगलं आहे, त्यामुळं महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार- आदित्य ठाकरे
SHARES

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तसंच, निवडणुक असल्यानं उमेदवारीसाठी नेते विविध पक्षात प्रवेश करतात. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. रविवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवारांच्या या वक्तव्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. 

महाराष्ट्र हिरवागार

याबाबत, 'आमचं खत चांगलं आहे, त्यामुळं महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार’, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी अंधेरी मरोळ येथील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य यांनी हे वक्तव्य केलं.

विकासाचं झाड

'मी लावलेलं हे विकासाचं झाड असून, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. तसंच, सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आमचं खत सगळीकडं चांगलं आहे. आधी पावसाचं इनकमिंग होऊ दे’, असं ठाकरे यांनी म्हटलं. आदित्या ठाकरे यांच्यासह अकराशे नागरिकांनी एकाच वेळी अकराशे रोपे लावली.हेही वाचा -

तिसरी एसी लोकल लवकर न पाठवण्याची पश्चिम रेल्वेची रेल्वे बोर्डाला विनंती

पुनर्विकसित इमारतींसाठी मेन्टेनन्स २५० रुपयेच राहणार- आशिष शेलारसंबंधित विषय
Advertisement