तिसरी एसी लोकल पाठवू नका, पश्चिम रेल्वेची रेल्वे बोर्डाला विनंती

'भेल' कंपनीच्या या दुसऱ्या लोकलमध्ये पहिल्या लोकलप्रमाणेचं तांत्रिक बिघाड होत असल्यानं तिसरी एसी लोकल इतक्यात न पाठवण्याची विनंती पश्चिम रेल्वेनं रेल्वे बोर्डाला केली आहे.

SHARE

श्चिम रेल्वे मार्गावरी प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी मिळण्यासाठी एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल केली. या एसी लोकलच्या विरार ते चर्चगेट स्थानकादरम्यान दिवसभरात १२ फेऱ्या होत आहेत. एसी लोकलला प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता दुसरी एसी लोकल मुंबईत चाचणीसाठी मे महिन्यात पाठविण्यात आली. मात्र, 'भेल' कंपनीच्या या दुसऱ्या लोकलमध्ये पहिल्या लोकलप्रमाणेचं तांत्रिक बिघाड होत असल्यानं तिसरी एसी लोकल इतक्यात न पाठवण्याची विनंती पश्चिम रेल्वेनं रेल्वे बोर्डाला केली आहे.

तांत्रिक बिघाड

दुसऱ्या एसी लोकलच्या दरवाजाच्या स्वयंचलित बंद होण्याच्या यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड येत आहेत. तसंच, यासंदर्भातील सॉफ्टवेअर योग्यरित्या काम करीत नसल्याचं समोर आलं असून, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टिममध्येही काही बिघाड येत आहेत. दरम्यान, या एसी लोकलची मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर चाचणी झाल्यानंतर पश्चिम रेल्वेला मिळणार आहे.

दिवसभरात १२ फेऱ्या

पश्चिम रेल्वे मार्गावर डिसेंबर २०१७मध्ये पहिली एसी लोकल प्रवाशांच्या सेवेत आली. या लोकलच्या दिवसभरात १२ फेऱ्या होत आहेत. तसंच, या एसी लोकला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत अाहे. त्यामुळं दुसऱ्या एसी लोकलमधील तांत्रिक बिघाड पाहता ही लोकल प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हेही वाचा -

मुंबईसह उपनगरात सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता

पुनर्विकसित इमारतींसाठी मेन्टेनन्स २५० रुपयेच राहणार- आशिष शेलारसंबंधित विषय
ताज्या बातम्या