Coronavirus cases in Maharashtra: 668Mumbai: 377Pune: 65Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Nagpur: 17Ahmednagar: 17Pimpri Chinchwad: 16Thane: 15Panvel: 11Latur: 8Vasai-Virar: 6Buldhana: 5Yavatmal: 4Satara: 3Aurangabad: 3Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Palghar: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Nashik: 1Washim: 1Amaravati: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 32Total Discharged: 52BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

मुंबईसह उपनगरात सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईसह उपनगरात मागील विकेंड झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे.

मुंबईसह उपनगरात सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता
SHARE

मुंबईसह उपनगरात मागील विकेंड झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, सोमवारी आणि मंगळवारी राज्यभरात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईत या दोन्ही दिवशी पावसाचा जोर वाढण्याचाही शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसानंतर रविवारी मुंबईकरांसाठी आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली.

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, मंगळवारी देखील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जिल्ह्याच्या साधारण ५० ते ७५ टक्के भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

६५ टक्के जास्त पाऊस

शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या पावसामुळं मुंबई उपनगरांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीच्या तब्बल ६५ टक्के जास्त पाऊस पडला आहे. मुंबई शहर, पालघर, ठाणे, रायगड या ठिकाणी देखील जास्तीच्या पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळं अनेक पर्यटकांचा विकेंड आनंदात गेला असून सखल भागांत पाणी साचल्यानं अनेकांची प्रचंड गैससोय झाली.हेही वाचा -

कर बचतीसह चांगला परतावा हवाय? 'या' आहेत पोस्टाच्या सर्वोत्तम योजनासंबंधित विषय
संबंधित बातम्या