Advertisement

आहे तिथेच राहा! भुजबळांविरोधात शिवसैनिकांचे बॅनर

‘भुजबळ तुम्हा आहात तिथेच राहा’, असं म्हणत त्यांच्या शिवसेना प्रवेशाला थेटपणे विरोध करणारे बॅनर्स मुंबईत झळकले आहेत.

आहे तिथेच राहा! भुजबळांविरोधात शिवसैनिकांचे बॅनर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ देखील शिवसेनेत प्रवेश करतील, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यावर भुजबळांकडून स्पष्टीकरण आल्यावर ‘भुजबळ तुम्हा आहात तिथेच राहा’, असं म्हणत त्यांच्या शिवसेना प्रवेशाला थेटपणे विरोध करणारे बॅनर्स मुंबईत झळकले आहेत.


शक्यता फेटाळली

सचिन अहिर यांनी गुरूवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत छगन भुजबळ देखील शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु आपल्या मनगटावर शिवबंधन नाही, तर अजूनही घड्याळच आहे, असं म्हणत भुजबळांनी स्वत: शिवसेना प्रवेशाची शक्यता फेटाळून लावल्याने या शक्यतांना पूर्णविराम मिळाला.

हेही वाचा- वरळीतून आदित्य लढवणार निवडणूक?

काय लिहिलंय बॅनरवर?

मात्र या घडामोडींवर भाष्य करणारे बॅनर्स मुंबईतील काही प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर “केसात गजरा आणि गावभर नजरा अशा काहीतरी नावाचे पूर्वी तमाशात वग नाट्य व्हायचे. त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्याशी मिळते जुळते वाटते! उगवला दिवस की मी परत येतो… साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही आपण आहे तिथेच रहा’’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे बनर्स रविंद्र तिवारी नावाच्या शिवसैनिकाने लावले आहेत. हेही वाचा-

नवाब मलिक राष्ट्रवादीचे नवे मुंबई अध्यक्ष

माझ्या मनगटावर घड्याळच! भुजबळांनी फेटाळली शिवसेना प्रवेशाची शक्यताRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा