Advertisement

माझ्या मनगटावर घड्याळच! भुजबळांनी फेटाळली शिवसेना प्रवेशाची शक्यता


माझ्या मनगटावर घड्याळच! भुजबळांनी फेटाळली शिवसेना प्रवेशाची शक्यता
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी गुरूवारी सकाळी शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अहिर यांच्या पाठोपाठ एकेकाळचे कट्टर शिवसेना नेते आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ देखील शिवसेनेत जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु या सर्व चर्चांना पूर्णविराम देत माझ्या मनगटावर घड्याळच असून मी शिवबंधन बांधून घेणार नाही, असा खुलासा भुजबळ यांनी गुरूवारी प्रसार माध्यमांपुढं केला. 

राजकीय संन्यास

छगन भुजबळ राजकीय संन्यास घेण्याच्या मनस्थितीत असले, तरी ते शिवसेनेत जावेत यासाठी भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ प्रयत्नशील आहे.छगन भुजबळ आणि सचिन अहिर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर बुधवारी रात्री फिरत होते.

म्हणून अफवा

पक्षबदलाच्या अफवेवर मौन सोडताना छगन भुजबळ म्हणाले, सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला, हे वृत्त मी इतरांप्रमाणेच टीव्हीवर पाहिलं. यासंदर्भात माझं आणि अहिर यांचं कुठल्याही प्रकारचं बोलणं झालं नाही. अहिर आणि माझा मूळ मतदारसंघ एकच आहे, त्यामुळे कदाचित त्यांच्यासोबत माझं नाव जोडलं जात असावं. 

माझ्या शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चेत काहीएक तथ्य नाही. उलट गुजरातसह समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणाऱ्या राज्यातील पहिल्या प्रकल्पाचं उद्घाटन नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील देवसाने इथं माझ्याच हस्ते होत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 



हेही वाचा-

सचिन अहीर शिवसेनेत, हाती बांधलं शिवबंधन

मिलिंद देवरा यांचं मुंबई अध्यक्षपद कायम? २ कार्याध्यक्षही मिळण्याची शक्यता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा