Advertisement

मिलिंद देवरा यांचं मुंबई अध्यक्षपद कायम? २ कार्याध्यक्षही मिळण्याची शक्यता

मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मिलिंद देवरा यांच्याकडं कायम राहणार असून त्यांच्या जोडीला २ नवे कार्याध्यक्ष येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मिलिंद देवरा यांचं मुंबई अध्यक्षपद कायम? २ कार्याध्यक्षही मिळण्याची शक्यता
SHARES

महाराष्ट्र काँग्रेसप्रमाणे मुंबई काँग्रेसलाही लवकरच नवीन कार्याध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मिलिंद देवरा यांच्याकडं कायम राहणार असून त्यांच्या जोडीला २ नवे कार्याध्यक्ष येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राजीनामा सत्र 

लोकसभा निवडणुकीची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. राहुल यांच्या पाठोपाठ देशभरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली होती. त्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. 

प्रदेशाध्यक्ष मिळाला

यापैकी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या जागी नुकतीच बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. एवढंच नाही, तर थोरात यांच्या जोडीला डाॅ. नितीन राऊत, बसवराज पाटील, डाॅ. विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसैन असे ५ कार्याध्यक्ष देखील दिले. 

संभ्रम दूर होणार

काँग्रेसला राज्यात प्रदेशाध्यक्ष मिळाला; पण विधानसभा निवडणुकीत मुंबईचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न अजूनही कार्यकर्त्यांना पडला आहे. हा संभ्रम लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. कारण मिलिंद देवरा यांचा राजीनामा फेटाळून त्यांना मुंबईच्या अध्यक्षपदी कायम ठेवून सोबतीला २ कार्याध्यक्ष देण्याची काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. या २ कार्याध्यक्षांमध्ये हुसेन दलवाई आणि एकनाथ गायकवाड यांच्या नावांची चर्चा आहे. हेही वाचा-

पुढचा मुख्यमंत्री मीच- फडणवीस

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं ध्येय - चंद्रकांत पाटीलRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा