राज्यात महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे मी फक्त भाजपाचाच नाही, तर शिवसेना, रिपाइं आणि रासपचाही मुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईतील गोरेगाव इथं भाजपाच्या विशेष कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका मांडली. शिवाय पुढचा मुख्यमंत्रीही मीच असेल, असं म्हणत त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयाचा निर्धार व्यक्त केली.
फडणवीस म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती करूनच निवडणुकांना समोरे जाणार आहे. निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचंच सरकार सत्तेत येईल याची मलाच नाही, तर सर्वांनाच खात्री आहे. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री कुणाचा होईल? याबाबत शिवसेना-भाजपचे नेते वक्तव्य करत आहेत. पण कुणी कितीही बोलो, निवडणुकीनंतर जनताच मुख्यमंत्री ठरवते, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली.
‘लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असलं तरी शत्रूला दुबळा समजू नका. पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरा. कारण युद्धाचं मैदान बदललं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनिती वेगवेगळी असते, त्यासाठी सज्ज व्हा.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. अशा पराभूतांबरोबर आपल्याला लढायचं असलं तरी त्यांना कमी लेखू नका. काँग्रेस पुढील १०-१५ वर्षे तरी विरोधी पक्ष म्हणूनच राहतील, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
हेही वाचा-
जागा वाटपावरून युतीत पुन्हा कलगीतुरा?
चंद्रकांत पाटील यांचा दावा हास्यास्पद- बाळासाहेब थोरात