Advertisement

चंद्रकांत पाटील यांचा दावा हास्यास्पद- बाळासाहेब थोरात

काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्षांपैकी एक कार्यध्यक्ष लवकरच भाजपात प्रवेश करेल, हा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेला दावा हास्यास्पद असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांचा दावा हास्यास्पद- बाळासाहेब थोरात
SHARES

काँग्रेसच्या नवनियुक्त कार्याध्यक्षांपैकी एक कार्यध्यक्ष लवकरच भाजपात प्रवेश करेल, हा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेला दावा हास्यास्पद असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षांबरोबरच काँग्रेसने ५ कार्याध्यक्षांचीही निवड केली आहे. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

तरूणांना संधी 

बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी काँग्रेस नेत्यांसोबत प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये सध्या सर्व आलबेल असून नेते आणि कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. जे कुणी काँग्रेस सोडून जातील, त्यांच्या जाण्याने युवा नेतृत्वाला संधीच मिळेल. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांचा दावा हास्यास्पद वाटतो.  

काय म्हणाले होते पाटील?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला असून ते राजीनामा देऊन हातपाय गाळत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षातील नेतेही राजीनामा देऊन भाजपात येण्यास इच्छुक आहेत. एवढंच काय, तर काँग्रेसच्या नवनियुक्त ५ कार्याध्यक्षांपैकी एखादा भाजपामध्ये सहभागी झाला तर आश्चर्य वाटायला नको असं त्यांनी म्हटलं होतं.

एकनिष्ठ कार्यकर्ता

काँग्रेस नेते विश्वजीत कदम भाजपात प्रवेश करतील अशा बातम्या काही दिवसांआधी प्रसार माध्यमांमध्ये फिरत होत्या. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे कदम यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. त्यावर बोलताना विश्वजीत कदम म्हणाले की, माझे वडील पतंगराव कदम यांनी ४० वर्षे काँग्रेसमध्ये काढली आहेत. मी देखील काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझी भूमिका वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

समतोल साधला

विभागीय संतुलन राखतानाच ज्येष्ठ, तरुण नेत्यांचा समतोल साधत काँग्रेसची नवी टीम बांधण्यात आली आहे. ही नवी टीम उत्तम पद्धतीने काम करेल. काँग्रेसचा पाया पुन्हा मजबुत करण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करणार आहोत, असंही कदम म्हणाले.



हेही वाचा-

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं ध्येय - चंद्रकांत पाटील

शिवसेनेला झालाय ‘हा’ रोग? मनसे नेते संदीप देशपांडे यांची इशारा मोर्चावर टीका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा