Advertisement

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं ध्येय - चंद्रकांत पाटील

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं माझं ध्येय असल्याचं म्हणत बुधवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं ध्येय - चंद्रकांत पाटील
SHARES

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं माझं ध्येय असल्याचं म्हणत बुधवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी तर आमदार मंगलप्रभात लोढा यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली. भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात बुधवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोघांनीही आपला पदभार स्वीकारला. 

सर्व मतदारसंघात तयारी

यावेळी केलेल्या भाषणात चंद्रकांत पाटील म्हणाले की, पक्ष मजूबत करतानाच मित्रपक्षासोबत युतीच्या २२० हून अधिक जागा निवडून आणणं ही आपली प्राथमिकता असेल. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांत निवडणुकीची तयारी करावी, असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं.

'हे' काँग्रेस नेते भाजपात येणार

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते राजीनामा देणार असून ते भाजपात येण्यास उत्सुक आहेत. पण त्यांची नावं सांगितली, तर सगळी मजा निघून जाईल. एवढंच नाही, तर काँग्रेसच्या नव्या ५ कार्याध्यक्षांपैकी एखादा भाजपात आल्यास आर्श्चय वाटायला नको, असंही ते म्हणाले.
हेही वाचा-

मुंबई काँग्रेसचा पाय खोलात!

चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेशाध्यक्षपदी, मंगल प्रभात लोढा बनले मुंबई अध्यक्षRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा