Advertisement

चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेशाध्यक्षपदी, मंगल प्रभात लोढा बनले मुंबई अध्यक्ष

महाराष्ट्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रात मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर हे पद रिकामेच होते. राज्यातील आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून नवीन प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू होता.

चंद्रकांत पाटील भाजपा प्रदेशाध्यक्षपदी, मंगल प्रभात लोढा बनले मुंबई अध्यक्ष
SHARES

महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई अध्यक्षपदाची धुरा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. भाजपाने मंगळवारी अधिकृत पत्रक काढून दोघांच्या नावाची घोषणा केली आहे. 

महाराष्ट्र भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची केंद्रात मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर हे पद रिकामेच होते. राज्यातील आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून नवीन प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू होता. अनेक नावांची चर्चा सुरू होती. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील वरिष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड  केली. 

प्रदेशाध्यक्ष पदाबरोबर भाजपाने मुंबई अध्यक्षपदाच्या नावाचीही घोषणा केली. आमदार मंगल प्रताप लोढा मुंबई अध्यक्ष बनले आहेत. मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी शोध सुरू होता. मलबार हिल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले लोढा हे सर्वाधिक कोट्याधीश बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची एकूण संपत्ती २७ हजार १५० कोटी रुपये आहे. लोढा भाजपाचे महाराष्ट्रचे उपाध्यक्षही होते. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा