Advertisement

जागा वाटपावरून युतीत पुन्हा कलगीतुरा?

भाजपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘युतीचा जागा वाटपाचा फाॅर्म्युला अद्याप ठरलेला नाही,’ असं वक्तव्य केल्यामुळे युतीच्या भवितव्याबाबत सूचक अर्थ काढला जात आहे.

जागा वाटपावरून युतीत पुन्हा कलगीतुरा?
SHARES

विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागताच भाजपा-शिवसेना युतीतील जागा वाटपाचा तिढा पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतो आहे. भाजपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘युतीचा जागा वाटपाचा फाॅर्म्युला अद्याप ठरलेला नाही,’ असं वक्तव्य केल्यामुळे युतीच्या भवितव्याबाबत सूचक अर्थ काढला जात आहे. 

पक्षप्रमुख नाराज

चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष होण्याआधी परस्पर जाहीर केलेल्या युतीच्या जागा वाटपाच्या फाॅर्म्युल्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाले होते. जागा वाटपाची बोलणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झाली असल्याने इतर कुणीही त्यात ताेंड घालू नये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाटील यांना फटकारलं होतं. त्यानंतर शांत झालेल्या पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जागा वाटपाच्या मुद्द्याला छेडलं आहे.     

सर्व जागांवर तयारी

पाटील यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या सोहळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना विधानसभेच्या सर्वच्या सर्व २८८ जागांवर तयारी करण्याचं आवाहन केलं. सोबतच जागा वाटपाचा फाॅर्म्युला अद्याप ठरलेला नसल्याने याआधीच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा सोडणार नाही, असंही जाहीर केलं आहे. 

पाटील यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या डोकेदुखीत आणखीनच भर पडणार असल्याचं दिसत आहे. हेही वाचा-

शिवाजी मंडई ऐरोलीला हलवणार? मासे विक्रेत्यांची राज ठाकरेंकडे धाव

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं ध्येय - चंद्रकांत पाटीलRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा