Advertisement

शिवाजी मंडई ऐरोलीला हलवणार? मासे विक्रेत्यांची राज ठाकरेंकडे धाव

शिवाजी मंडई थेट ऐरोलीला हलवण्यात येणार असल्याची नोटीस मासे विक्रेत्यांच्या हाती पडल्याने त्यांच्या संतापात भर पडली आहे. मासे विक्रेत्यांना थेट शहराबाहेर फेकलं जात असल्याची त्यांची भावना आहे.

शिवाजी मंडई ऐरोलीला हलवणार? मासे विक्रेत्यांची राज ठाकरेंकडे धाव
SHARES

क्राॅफर्ड मार्केट शेजारील मुंबई महापालिकेची छत्रपती शिवाजी मंडई धोकादायक झाल्याने या मंडईत बसणाऱ्या मासे विक्रेत्यांना थेट ऐरोली नाका इथं जाण्याची नोटीस महापालिकेने पाठवली आहे. या नोटीशीमुळे येथील मासे विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या मासे विक्रेत्यांनी गुरूवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत याप्रकरणी मध्यस्ती करण्याची मागणी केली आहे. त्यावर राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन यासंदर्भात जाब विचारणार असल्याचं आश्वासन दिल्याचं समजत आहे. 

धोकादायक मंडई

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महात्मा फुले मंडईच्या (क्रॉफर्ड मार्केट) बाजूला पलटण रोडवर ही महापालिकेची अंदाजे ४० वर्षे जुनी शिवाजी मंडई आहे. ही मंडई ४ मजल्यांची आहे. मंडई धोकादायक अवस्थेत असल्याने आॅक्टोबर २०१३ मध्ये महापालिकेने मंडई रिकामी केली. महापालिकेने या मंडईचा पुनर्विकास करण्याचं ठरवलं असून मंडई पाडण्यासाठी महापालिकेला २ कोटी ६० लाख रुपये खर्च येणार आहे. परंतु येथील मासे विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्यावरून चांगलाच वाद उद्धवला आहे.  


पर्यायी जागेवरून वाद

शिवाजी मंडईच्या तळमजल्यावर सुमारे २०० मासळी विक्रेते बसतात. इथून दररोज लाखो रुपयांची मासे विक्री होती. शेकडो मासे विक्रेते या व्यवसायावर अवलंबून आहेत. इमारतीचा पुनर्विकास होईपर्यंत आधी बीपीटीच्या जागेवर नंतर मुलुंडमध्ये पर्यायी जागा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. परंतु हा निर्णय विक्रेत्यांना मान्य नसल्याने या विक्रेत्यांना क्रॉफर्ड मार्केटमध्येच मासळी-मटण विभागाच्या मोकळ्या जागेत हलविण्याचं महापालिकेने ठरवलं होतं. 

चुकीचा शब्दप्रयोग

त्यातच आता थेट ऐरोलीला हलवण्यात येणार असल्याची नोटीस मासे विक्रेत्यांच्या हाती पडल्याने त्यांच्या संतापात भर पडली आहे. मासे विक्रेत्यांना थेट शहराबाहेर फेकलं जात असल्याची त्यांची भावना आहे. शिवाय महापालिकेने दिलेल्या नोटीशीत ‘कायमस्वरूपी जागा मिळण्यासापेक्ष स्थलांतरीत’ असा शब्दप्रयोग केल्याने महापालिका चुकीच्या शब्दप्रयोगातून कोळी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या मासे विक्रेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं. 



हेही वाचा-

शिवसेनेला झालाय ‘हा’ रोग? मनसे नेते संदीप देशपांडे यांची इशारा मोर्चावर टीका

चंद्रकांत पाटील यांचा दावा हास्यास्पद- बाळासाहेब थोरात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा