Advertisement

राष्ट्रवादीला नवी मुंबईतही खिंडार, गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते माजी आमदार गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांसह नाईक भाजपात प्रवेश करतील, असं म्हटलं जात आहे.

राष्ट्रवादीला नवी मुंबईतही खिंडार, गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर?
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नवी मुंबईतील नेते माजी आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांसह नाईक भाजपात प्रवेश करतील, असं म्हटलं जात आहे. 

नगरसेवकांची बैठक

नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांची बैठक बोलवली असून या बैठकीत भाजप प्रवेशाच्या (BJP) निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसं झाल्यास मुंबईसोबत राष्ट्रवादीच्या नवी मुंबईतील साम्राज्याला मोठं खिंडार पडणार आहे. 

राष्ट्रवादीची सत्ता जाणार?

नाईक यांच्या माध्यमातून मागील २० वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेत (NMMC) राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांना आघाडी मिळाली होती. मतदारांचा बदलता कल पाहता  राष्ट्रवादीला नवी मुंबईत धोका निर्माण झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचं मत आहे. त्यामुळे ठाणे (TMC) तसंच नवी मुंबई महापालिकेतील काही नगरसेवकांनी रविवारी गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपात प्रवेश करण्याची मागणी केली आहे. तसं केल्यास सत्ता राखता येऊ शकते, असं सर्व नगरसेवकांचं मत आहे. 

राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी नुकताच शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केला.  राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वाघ लवकरच भाजपात प्रवेश करतील, असं म्हटलं जात आहे. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हे देखील भाजपात प्रवेश करू शकतात.   

भाजपप्रवेशावर गणेश नाईक काय निर्णय घेणार ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.हेही वाचा-

आहे तिथेच राहा! भुजबळांविरोधात शिवसैनिकांचे बॅनर

सचिन अहीर शिवसेनेत, हाती बांधलं शिवबंधनसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा