Advertisement

प्रवाहाविरोधात लढण्याची हिंमत नव्हती म्हणून अहिर गेले- नवाब मलिक

'प्रवाहाविरोधात लढण्याची हिंमत नव्हती म्हणूनच सचिन अहिर शिवसेनेत गेले’, अशी बोचरी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

प्रवाहाविरोधात लढण्याची हिंमत नव्हती म्हणून अहिर गेले- नवाब मलिक
SHARES

'प्रवाहाविरोधात लढण्याची हिंमत नव्हती म्हणूनच सचिन अहिर शिवसेनेत गेले’, अशी बोचरी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. अहिर यांच्या पक्षप्रवेशावर प्रसार माध्यमांशी बोलताना मलिक यांनी यांनी हे वक्तव्य केलं. सोबतच अहिर यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी एका हिंदी कवितेच्या ओळीही ट्विट केल्या आहेत. हे ट्विट सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.

पक्षाने सर्वकाही दिलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री यांनी गुरूवारी सकाळी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने सचिन अहिर यांना अतिशय कमी वयात आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं. पक्षाच्या जोरावरच त्यांनी राजकारणात आपलं स्थान बनवलं. पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला असला, तरी त्यांनी कठीण काळात पक्षाची साथ सोडली. त्यांचा हा निर्णय अतिशय दु:खद आहे.' 

कुवत नव्हती

'राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष असूनही त्यांना पक्ष वाढवता आला नाही. कारण त्यांच्यात तेवढी ताकदच नव्हती. त्यांना ही जबाबदारी न झेपल्यानेचं त्यांना जबाबदारीतून पळ काढला. अहिर यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीला धक्का वगैरे अजिबात बसलेला नाही. राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबतच आहेत. कुणीही अहिर यांच्यासोबत गेलेलं नाही, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.  

शिवसेना, भाजपाचा भ्रम

दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन शिवसेना आणि भाजपाला आपण  वाढतोय असं वाटत असल्यास, तो त्यांचा भ्रम आहे. कारण पुढच्या निवडणुकीत मुंबईत आम्ही त्यांचा पराभव करू,' असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.हेही वाचा-

माझ्या मनगटावर घड्याळच! भुजबळांनी फेटाळली शिवसेना प्रवेशाची शक्यता

सचिन अहीर शिवसेनेत, हाती बांधलं शिवबंधनRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा