Advertisement

‘त्यांचं’ ठरलं ! राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक जाणार भाजपात

नवी मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी भाजपात जाण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

‘त्यांचं’ ठरलं ! राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक जाणार भाजपात
SHARES

विधानसभा निवडणूक (vidhan sabha election) तोंडावर आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षाला लागलेली गळती काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीय. नवी मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी भाजपात जाण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. हा निर्णय लवकरच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक (ganesh naik) यांना कळवण्यात येणार असून त्यानुसार नाईक अधिकृतरित्या पक्षप्रवेशाची घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.    

नाईक घेतील अंतिम निर्णय

भाजपात जायचं की नाही यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी दुपारी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार (Jayawant sutar) यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत ५२ नेत्यांनी भाजपात जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. हा निर्णय लवकरच गणेश नाईक तसंच आमदार संदीप नाईक (Sandeep naik) यांना कळवण्यात येणार आहे. त्यानंतर ते या निर्णयावर अंतिम निर्णय घेतील.  

भाजपाची सत्ता ?

नाईक यांच्या माध्यमातून मागील २० वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेत (NMMC) राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांना आघाडी मिळाली होती. मतदारांचा बदलता कल पाहता  राष्ट्रवादीला नवी मुंबईत धोका निर्माण झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचं मत आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश केल्यास सत्ता राखता येऊ शकते, असं सर्व नगरसेवकांचं मत आहे. 



हेही वाचा-

इव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे ९ ऑगस्टला करणार आंदोलन

आमदार कोळंबकरांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा