Advertisement

आमदार कोळंबकरांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला?

आज-उद्या करत करत अखेर काँग्रेस (congress) आमदार कालिदास कोळंबकर (kalidas kolambkar) यांच्या भाजप (Bjp) प्रवेशाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे. कोळंबकर येत्या मंगळवारी भाजपात अधिकृतरित्या प्रवेश करतील, असं म्हटलं जात आहे.

आमदार कोळंबकरांच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला?
SHARES

आज-उद्या करत करत अखेर काँग्रेस (congress) आमदार कालिदास कोळंबकर (kalidas kolambkar) यांच्या भाजप (Bjp) प्रवेशाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे. कोळंबकर येत्या मंगळवारी भाजपात अधिकृतरित्या प्रवेश करतील, असं म्हटलं जात आहे. 

मुख्यमंत्र्यांशी जवळीक

आमदार कोळंबकर हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि निकटवर्तीय मानले जातात. राणे २०१७ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांच्यापाठी जायचं की काँग्रेससोबत राहायचं असा प्रश्न त्यांना सतावू लागला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीआधी कोळंबकर यांच्या कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले फ्लेक्स लावल्याने ते भाजपात जाणार हे स्पष्ट झालं. 

हेही वाचा- चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारची मान्यता

कामं झाली 

काँग्रेसमध्ये १० वर्षे राहूनही कामं झाली नाही. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मतदारसंघातील पोलिस आणि मिल कामगारांच्या घरांचा प्रश्न, भीमज्योत इ. कामे केली. त्यामुळे काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा मी निर्णय घेतल्याचं कोळंबकर प्रसार माध्यमांना म्हणाले होते. शिवाय त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. देवेंद्र फडणवीस याचं गुणगाण करणारे कोळंबकर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच भाजपात जातील असं म्हटलं जात आहे.

कोळंबकर यांची कारकिर्द  

कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघातून सातवेळा निवडून आले आहेत. पूर्वी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे कोळंबकर शिवसेनेच्या तिकीटावर पाचवेळा निवडून आले होते. २००५ मध्ये नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर कोळंबकर देखील राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले होते. हेही वाचा-

कालिदास कोळंबकर पंतप्रधानांच्या रॅलीत

शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना आमदार कोळंबकरांचा पाठिंबासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा