Advertisement

कालिदास कोळंबकर पंतप्रधानांच्या रॅलीत

शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली मुबंईतील बीकेसी परिसरात पार पडली. या रॅलीला काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही हजेरी लावली होती.

कालिदास कोळंबकर पंतप्रधानांच्या रॅलीत
SHARES

शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली मुबंईतील बीकेसी परिसरात पार पडली. या रॅलीला काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही हजेरी लावली होती. यापूर्वी कोळंबकर यांनी राहुल शेवाळे यांच्या प्रचारसभेला हजेरी लावत काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर काँग्रेसनंही यावर नाराजी व्यक्त केली होती.


काम करणाऱ्यांना समर्थन

आपल्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचं काम न झाल्यामुळं आपण नाराज असल्याचं मत कालिदास कोळंबकर यांनी बोलताना व्यक्त केलं. जे काम करतात त्यांना आपण समर्थन देणार असून यापूर्वी आपण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचंही भाषण ऐकायला जात होतो, असंही त्यांनी सांगितलं. यापूर्वी अनेकदा कोळंबकर यांनी काँग्रेसप्रती आपली नाराजी व्यक्त केली होती. तसंच अनेकदा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुतीही केल्याचं पहायला मिळालं होतं.

कोळंबकर ६ वेळा विधानसभेवर निवडून गेले आहे. कोळंबकर हे नारायण राणे यांचे समर्थक मानले जात होते. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कोळंबकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा -

'असे' शोधा तुमच्या घराजवळील मतदान केंद्र

महाराष्ट्रातील नेते उ. प्रदेशात करणार प्रचार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा