Advertisement

शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना आमदार कोळंबकरांचा पाठिंबा

मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर शिवसेना-भाजपच्या उमेदवारांचा प्रचारात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालिदास कोळंबर यांनी दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा दिल्याचं समोर येत आहे.

शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना आमदार कोळंबकरांचा पाठिंबा
SHARES

मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर शिवसेना-भाजपच्या उमेदवारांचा प्रचारात सहभागी झाले. कालिदास कोळंबर यांनी दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा दिला आहे.


काँग्रेसवर नाराज

'मी काँग्रेसवर नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलं म्हणून मला पक्षानं बाहेर केलं' असं म्हणत कालिदास कोळंबकरांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. दक्षिण मध्य मुंबईतून युतीचे उमेदवार राहुल शेवाळेच विजयी होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वासही कोळंबकरांनी व्यक्त केला आहे.


राहुल शेवाळेंच्या संपर्कात

काही दिवसांपूर्वी कोळंबकर यांनी दक्षिण मध्य मुंबईतील आघाडीचे उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याकडून कोणताही संपर्क झालेला नाही. तर युतीचे उमेदवार असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे संपर्कात आहेत. त्यामुळे 'बॉस'च्या आदेशानंतर मी युतीचा प्रचार करणार, असा इशारा कालिदास कोळंबकरांनी दिला होता. तसंच, यावेळी भविष्यात ज्या पक्षात जाणार आहे, त्या पक्षाचे बॉस, असा उल्लेख केला होता.हेही वाचा -

मेहुल चोक्सीला दणका, बॅंका करणार कंपनीचा लिलाव

क्रॉफर्ड मार्केटच्या ‘फेज-२’च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement