Advertisement

क्रॉफर्ड मार्केटच्या ‘फेज-२’च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ऐतिहासिक महात्मा जोतिबा फुले मंडईमधील (क्रॉफर्ड मार्केट) च्या ‘फेज-२’च्या पुनर्विकासाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळं मोकळा झाला आहे. या पुनर्विकासात क्रॉफर्ड मार्केटमध्ये दुमजली अंडरग्राऊंड पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

क्रॉफर्ड मार्केटच्या ‘फेज-२’च्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ऐतिहासिक महात्मा जोतिबा फुले मंडईमधील (क्रॉफर्ड मार्केट) च्या ‘फेज-२’च्या पुनर्विकासाचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळं मोकळा झाला आहे. या पुनर्विकासात क्रॉफर्ड मार्केटमध्ये दुमजली अंडरग्राऊंड पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे १९८ गाड्या आणि २० ट्रकसाठी ही पार्किंग व्यवस्था असल्यामुळं फोर्ट परिसरातील वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.


२ टप्प्यांत पुनर्विकास

हेरिटेज क्रॉफर्ड मार्केटचा ‘फेज-१’ आणि ‘फेज-२’ अशा २ टप्प्यांत पुनर्विकास करण्याचं धोरण महापालिकेच्या माध्यमातून आखण्यात आलं आहे. २००८ मध्ये हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी भेट देऊन तपासणी करण्यात आली होती. यामध्ये क्रॉफर्ड मार्केटला ‘हेरिटेज – १’चा दर्जा असल्याचा अहवाल देत दुरुस्ती, पुनर्विकास सुचवला होता. त्यानुसार सप्टेंबर २०१४ पासून ‘फेज-१’च्या पुनर्विकासाचं काम सुरू करण्यात आलं असून २०१८ मध्ये हे काम पूर्ण करण्यात आलं.


२०२२ पर्यंत काम पूर्ण

‘फेज-२’टप्प्यातील पुनर्विकासाबाबत या ठिकाणच्या गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानं हे काम रखडलं होतं. पालिकेच्या बाजार विभागानं मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात योग्यरीत्या बाजू मांडल्यानं आता पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे. क्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासात दुमजली पार्किंग बांधण्यात येणार आहे. या पार्किंगमध्ये मालगाड्या भरण्यासाठी आणि रिकाम्या करण्यासाठी जागा ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं परिसरात मालवाहू गाड्यांमुळं निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.हेही वाचा -

ऊर्मिला यांच्या प्रचार रॅलीदरम्यान पुन्हा मोदींच्या घोषणा

रेल्वे तिकीट दलालांला पकडण्याची जबाबदारी प्रवाशांवरRead this story in English or हिंदी
संबंधित विषय