Advertisement

रेल्वे तिकीट दलालांला पकडण्याची जबाबदारी प्रवाशांवर

बोगस तिकीट तपासनीसांप्रमाणं, प्रवाशांची रेल्वे तिकीट दलालांकडून देखील फसवणूक होते. त्यामुळं या दलालांना पकडण्याची जबाबदारी आता रेल्वे प्रवाशांवर सोपविण्यात आली आहे. आरपीएफनं त्यासाठी व्हॉटस्अॅप हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून, या क्रमांकावर दलालांचे ‘फोटो’ काढून पाठवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

रेल्वे तिकीट दलालांला पकडण्याची जबाबदारी प्रवाशांवर
SHARES

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील बोगस तिकीट तपासनीसांमुळं प्रवाशांची लूट होते. त्यामुळं मध्य रेल्वे प्रशासनानं तिकीट तपासनीसांना ‘क्यूआर कोड' असलेले ओळखपत्र दिले आहेत. त्यामुळं प्रवाशांना बोगस तिकीट तपासनीस ओळखणं सहज शक्य होणार आहे. दरम्यान, बोगस तिकीट तपासनीसांप्रमाणं, प्रवाशांची रेल्वे तिकीट दलालांकडून देखील फसवणूक होते. त्यामुळं या दलालांना पकडण्याची जबाबदारी आता रेल्वे प्रवाशांवर सोपविण्यात आली आहे. आरपीएफनं त्यासाठी व्हॉटस्अॅप हेल्पलाइन क्रमांक जारी केला असून, या क्रमांकावर दलालांचे ‘फोटो’ काढून पाठवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


तिकीटांच्या नावाखाली लुटमार 

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनिमित्त रेल्वे तिकिटांना प्रचंड मागणी असते. अशावेळी रेल्वे दलाल सक्रिय झालेले असतात. या दलालांकडून रेल्वे तिकीटाच्या नावाखाली प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेतात. त्यामुळं प्रवाशांची होणारी ही लुटमार थांबवण्यासाठी तसंच या दलालांचा छडा लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफनं दलालांना पकडण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे.


हेल्पलाइन क्रमांक

मध्य रेल्वेनं आपण दलालांपासून त्रस्त आहात काय? अशी टॅगलाइन लावून दलालांचे फोटो तसंच स्थानकाचं नाव पाठविण्यासाठी ९९८७६४५३०७ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. फोटो प्राप्त होताच रेल्वे सुरक्षा दल दलालांच्या रेकॉर्डची छाननी करून पाहणार आहे. त्यानंतर रेल्वे कायदा कलम १४२, १४३, १४४, १४५, १४६ अन्वये तिकीट दलालांवर कारवाई करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

ऊर्मिला यांच्या प्रचार रॅलीदरम्यान पुन्हा मोदींच्या घोषणा

सलीम खान, मधुर भंडारकर, हेलन यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा