शुक्रवारी शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण

२१ व्या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण २७ जुलैला होणार आहे. हे आतापर्यंतचं सर्वात मोठं चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण २७ जुलैच्या रात्री सुरू होऊन २८ जुलैच्या पहाटेपर्यंत चालणार आहे. म्हणजे जवळपास १०३ मिनिटं एवढा वेळ हे चंद्रग्रहण असणार आहे. मुंबई, पुणे आणि दिल्ली यासह अनेक शहरांतून हे चंद्रग्रहण दिसणार आहे.

ब्लड मून

यंदाचं खग्रास चंद्रग्रहण ऐतिहासिक असणार आहे. हे चंद्रग्रहण ३ तास ५५ निनिटं होणार असून त्यातील खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटं दिसणार आहे. पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान जेव्हा चंद्र पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा त्याच्यावर लाल रंगाची सावली पडते. म्हणून त्याला 'ब्लड मून' असं म्हणतात. चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला जातो. यातही सूर्याची लाल किरणे चंद्रापर्यंत पोहोचतात.

कधी होणार सुरू?

२७ जुलैला आषाढ पौर्णिमेच्या रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ होईल. मध्यरात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्यानं लालसर दिसेल. म्हणजेच खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. त्यानंतर मध्यरात्री २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास प्रारंभ होईल. ३ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्यानं ग्रहण सुटेल.

कसं पाहता येईल चंद्रग्रहण?

साधारण चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. पण २७ जुलै म्हणजेच शुक्रवारी चंद्र पृथ्वीपासून ४ लक्ष ६ हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहण पाहण्यासाठी आकाश निरभ्र असणं आवश्यक आहे. ८ इंची किंवा त्यापेक्षा जास्त इंचाच्या दुर्बिणीतून ते पाहता येईल. तसं डोळ्यांनी देखील ब्लड मून पाहता येईल.

आत्तापर्यंतचं मोठे चंद्रग्रहण

गेल्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० रोजी झाले होते. त्यावेळी खग्रास स्थिती १ तास ४७ मिनिटं होती. यावर्षी ही स्थिती ३ तास ५५ मिनिटं असणार आहे. तर पुढील शतकातील सर्वात मोठे खर्गास ग्रहण ९ जून २१२३ आणि १९ जून २१४१ होणार आहे. त्यावेळी खग्रास स्थिती १ तास ४६ मिनिटं दिसणार आहे.


हेही वाचा

खारफुटी संवर्धनासाठी युनायटेड वे कडून विविध स्पर्धा


पुढील बातमी
इतर बातम्या