Advertisement

खारफुटी संवर्धनासाठी युनायटेड वे कडून विविध स्पर्धा


खारफुटी संवर्धनासाठी युनायटेड वे कडून विविध स्पर्धा
SHARES

दर वर्षी २६ जुलैला जगभरात खारफुटी जंगल संवर्धन दिन साजरा केला जातो. २०३० पर्यंत शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून युनेस्कोकडून या दिनाची घोषणा करण्यात आली आहे. याच अनुषंगाने मुंबईतील युनायटेड वे मुंबई या संस्थेच्या माध्यमातून खारफुटी जंगलाचं संवर्धन करण्यासाठी आणि त्या संदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशानं आंतर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

'मॅनग्रोव्ह दी शोरकीपर ऑफ मुंबई' असं या स्पर्धेचं नाव अाहे. यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजीत केल्या अाहेत. या सर्व स्पर्धा मोफत असून जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन युनायटेड वे  मुंबई या संस्थेकडून करण्यात आलं आहे. या उपक्रमात गोदरेज, वनशक्ती, मॅनग्रोव्ह फाउंडेशन, आयनेचरवॉच फाउंडेशन या संस्थांचाही सहभाग आहे.

अशा असतील स्पर्धा

छायाचित्रण स्पर्धा - स्पर्धकांना त्यांच्या आसपासच्या परीसरातील खारफुटींच्या झाडांचे, जंगलांचे फोटो काढून ते ई मेलच्या माध्यमातून पाठवायचे आहेत. एका स्पर्धकाला केवळ एकच फोटो पाठवता येणार आहे. काढलेल्या फोटोला एक कॅप्शन देऊन तो कुठे काढला याची माहिती द्यावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी info@inaturewatch.org संकेतस्थळावर संपर्क साधण्याचं अावाहन केलं अाहे.

म्हणी व काव्य स्पर्धा - खारफुटीचे संवर्धन या विषयावर कविता आणि म्हणी तयार करुन त्या वरील संकेतस्थळावरील अर्जासोबत जोडायच्या आहेत.

चित्रकला स्पर्धा - ही स्पर्धा २५ जुलैला ऐरोलीच्या कोस्टल अँड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटर येथे दुपारी २.३० ते ५.३० यावेळेत असणार आहे. खारफुटी आणि पर्यावरण या विषयावर चित्र काढायचे आहे. ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असणार आहे


खारफुटी जंगल मुंबईचे सुरक्षारक्षक

खारफुटीची झाडं खाऱ्या पाण्यात वाढत असल्यामुळे समुद्राच्या काठांवर, खाड्यांमधे ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. माती आणि पाणी असलेल्या दलदलीच्या भागात या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. खारफुटींच्या झाडांमुळे समुद्र किनाऱ्यांची झीज होत नाही. यामुळे समुद्रात येणाऱ्या वादळ, वाऱ्यांपासून, मोठमोठ्या लाटांपासून किनाऱ्यावरील लोकवस्तीचे रक्षण होते. मासे आणि इतर समुद्री जीवांसाठी ही जंगले खाद्यांनाचा मोठा स्त्रोत असतात. मुंबईच्या किनाऱ्याचे आणि पर्यायानं मुंबईचे खरे सुरक्षारक्षक ही जंगलं आहेत.


खारफुटी वाचवणं, त्यांचं संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे. खारफुटीच्या संवर्धनासाठी आम्ही काम करतो. यामधे खारफुटीची झाडे लावण्याचा उपक्रम सुद्धा हाती घेण्यात आला आहे. मुंबईमधे जवळपास एक लाख खारफुटीची झाडे लावण्याचा आमचा उद्देश आहे. यापैकी काही हजार झाडे आम्ही लावली आहेत.
 -अश्विनी पवार, समन्वयक,  युनायटेड वे मुंबई



हेही वाचा -

महाघोटाळा! धोकादायक झाडं आणि फांद्या कापण्यासाठी १५० कोटींचा खर्च!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा