1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारीवर बंदी

(Representational Image)
(Representational Image)

महाराष्ट्र सरकारने 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारीवर बंदी घातली आहे. हा निर्णय नुकताच सागरी मासेमारी नियमन कायदा 1981 अंतर्गत घोषित करण्यात आला. हा कायदा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून 12 सागरी मैलांच्या आत मशीनी मासेमारी करण्यास मनाई करतो.

एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जर एखाद्या ट्रॉलर ऑपरेटरने या बंदीचे खुलेआम उल्लंघन केले तर जून नंतर उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड आकारला जाईल.

पावसाळ्यातल्या या बंदी दरम्यान, शनिवारी, 21 मे रोजी रात्री मुंबईतील बऱ्यापैकी भागात हलका रिमझिम पाऊस झाला. यामध्ये दादर, शिवडी, माटुंगा, परळ आदी भागांचा समावेश होता. याशिवाय नवी मुंबईसारख्या लगतच्या भागातही पावसाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचा पुढील २४ तासांचा हवामान अंदाज "साधारणपणे ढगाळ आकाश आणि हलका पाऊस / रिमझिम पावसाची शक्यता आहे." कमाल 35 अंश सेल्सिअस तापमानासह किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.


हेही वाचा

गूडन्यूज! मुंबईत ६ जूनपासून पावसाची शक्यता

आदित्य ठाकरेंचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बारगळला, पवईत सायकल ट्रॅकला नकार

पुढील बातमी
इतर बातम्या