महाराष्ट्र : २०२०मध्ये बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ, ५ वर्षांतील सर्वाधिक मृत्यूची नोंद

महाराष्ट्र वनविभागानं सादर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत राज्यात १५९ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. ५ वर्षांमधील ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. याशिवाय २०२० मध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये दशकातील सर्वाधिक मानवी मृत्यूची नोंद झाली आहे.

प्रधान वनसंरक्षक (PCCF), वन्यजीव यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी झालेल्या १५९ मृत्यूपैकी ८० बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. तर ६४ बिबट्यांचा रस्ता आणि रेल्वे ओलांडताना, इतर प्राण्यांचा शिकार यामुळे मृत्यू झाला. याखेरीज दोन बिबट्यांची शिकार करण्यात आली होती. यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पीसीसीएफ-वाइल्डलाइफ, नितीन काकोडकर यांनी स्पष्टीकरण दिलं की, २०२० मध्ये बिबट्यांचा मृत्यू आणि मानवी मृत्यूची संख्येचं मुख्य कारण राज्यातील जंगलांमध्ये बिबट्यांची वाढलेली संख्या आहे.

“आतापर्यंत लोकसंख्येचा अंदाज घेतलेला अभ्यास नसला तरी, सर्वत्र (ग्रामीण, शहरी आणि कृषी क्षेत्रे, जंगले) जनावरे पसरलेली असल्यानं राज्यभरातून प्रकरणं नोंदवली जात आहे. बहुतेक भागात लोक या प्राण्याबरोबर रहायला शिकले आहेत, तर बिबट्यादेखील त्यांच्या सभोवतालच्या धोक्यांस अनुकूल आहेत. या घटकांमुळे त्यांची संख्या वाढू दिली आहे, ” असं काकोडकर म्हणाले.

यावर्षी शिकार करण्याचे प्रकार अधिक घडत असल्याचं त्यांनी कबूल केलं. राज्य वन विभाग येत्या काही वर्षांत अस्तित्त्वात असलेल्या बिबट्या लोकसंख्येचे अचूक सर्वेक्षण करण्याचा विचार करीत आहे.

“आम्ही सर्व क्षेत्रांसाठी नमुना-आधारित पध्दतीकडे जाण्याचा विचार केला आहे. बिबट्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचं दिसून येत आहे. तरी, आम्ही हॉटस्पॉट्स ओळखले आहेत जिथे बहुतेक बिबट्यांचा मृत्यू किंवा मानवी हत्येची नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक, नगर, मराठवाड्याचा काही भाग, विशेषत: औरंगाबाद, रत्नागिरी आणि पुणे, कोल्हापूर, सांगली, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा संपूर्ण ऊस पट्टा यांचा समावेश आहे.”


हेही वाचा

मुंबईतील मालाड, बोरिवली सर्वाधिक प्रदूषित

शिवाजी पार्कच्या 'मधली गल्ली'तल्या रहिवाशांचा स्तुत्य उपक्रम

पुढील बातमी
इतर बातम्या