Advertisement

शिवाजी पार्कच्या 'मधली गल्ली'तल्या रहिवाशांचा स्तुत्य उपक्रम

मधली गल्ली इथल्या रहिवाशांनी घरा-घरातील वापरात नसलेल्या चपला आणि ई-कचरा गोळा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

शिवाजी पार्कच्या 'मधली गल्ली'तल्या रहिवाशांचा स्तुत्य उपक्रम
SHARES

जुन्या चपला, बूट आणि सँडल आपल्या प्रत्येकाच्या घरी एका कोपऱ्यात धूळखात पडलेल्या असतात. जास्तीत जास्त आपण काय करतो? तर, या जुन्या चपला कचऱ्यात टाकून देतो.

पण कधी याचा विचार केला आहे का, या चपलांमुळे किती प्रदूषण होतं ते? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चपलांमुळे कसं प्रदूषण होतं? तर जुन्या चप्पल कचऱ्यात जाऊन त्यातील सिथेंटिक मटेरिअल, प्लास्टिक, फोम याचं विघटन होत नसल्यानं पर्यावरणाला धोका निर्माण होतो.  

अशाचप्रकारे पर्यावरणाला आणखी एक धोका आहे तो ई-कचऱ्यापासून. निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून तयार झालेला कचरा म्हणजे ई-कचरा. अगदी मोबाइल आणि संगणकापासून घड्याळ, बंद पडलेला रेडिओ, सेल, इलेक्ट्रोनिक वस्तूंचे सुटे पार्ट या सगळ्या गोष्टी ई-कचऱ्यात समाविष्ट होतात. अपुऱ्या माहितीमुळे ई-कचरा सामान्य कचऱ्यात मिसळून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचतो आण‌ि समस्येचा ‘डोंगर’ उभा राहातो.


'मधली गल्ली'चा स्तुत्य उपक्रम

पण या समस्येचा बोजा कमी करण्यासाठी दादरच्या मधली गल्ली इथल्या रहिवाशांनी  पुढाकार घेतला आहे. मधली गल्ली इथल्या रहिवाशांनी घरा-घरातील वापरात नसलेल्या चपला आणि ई-कचरा गोळा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जमा करण्यात आलेल्या चपला आणि ई-कचरा पुर्नप्रकियेसाठी Recyclekaro आणि green sole या कंपन्यांकडे पाठवला जाईल. 

मधली गल्लीतल्या रहिवाशांतर्फे पहिल्यांदाच हा उपक्रम राबवला जात आहे. सुरुवातीला आम्ही ई-कचरा आणि जुन्या चपला रिसायकलचा उपक्रम हाती घेतला आहे. पुढे आम्ही प्लास्टिक ड्राइव्ह, प्लान्ट नर्सरी (घरात कुठली झाडं लावायची?) सारखे उपक्रम हाती घेणार आहोत. एकूणच फक्त एका उपक्रम करून थांबणार नाही आहोत. तर ही सुरुवात आहे. पुढे शिवाजी पार्कच्या वेगवेळ्या भागात हे उपक्रम राबवले जातील. 

डॉ.प्रसाद मोडक, सदस्य, मधली गल्ली 


‘हे’ देऊ शकता?

या उपक्रमाद्वारे तुम्ही तुमच्या घरातील ई-कचरा जसं की, सेल, ईलेक्ट्रोनिक वस्तूंचे सुटे भाग, टीव्ही, एसी, खराब रेडिओ अशा वस्तू देऊ शकता. तर फ्लॅट चपला, स्पोर्ट शूज, फॉर्मल आणि कॅज्युअल शूज देऊ शकता. पण सहा वर्षाखालील मुलांचे शूज, महिलांच्या हिल्स सँडल, खराब किंवा तुंटलेल्या अवस्थेतील चप्पला स्वीकारल्या जाणार नाहीत.  


कधी आहे उपक्रम?

तुमच्या घरात देखील अशाच प्रकारचा टाकाऊ कचरा असेल तर २२ नोव्हेंबरला आयोजित या उपक्रमात सहभागी व्हा. दादरच्या शिवाजी पार्क इथल्या डॉ. मधुकर राऊत रोड जवळ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सकाळी १० ते सकाळी ११ या वेळेत तुम्ही श्रीकृपा बिल्डिंग इथं आपल्याकडील टाकाऊ ई-कचरा आणि चपला 'मधली गल्ली'च्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करू शकता. या  ई-कचरा आणि चपला कंपन्यांपर्यंत पोहचवल्या जातील.


‘या’ कंपन्यांचा पाठिंबा

  • रिसायकल करो :

RECYCLEKARO या कंपनीची स्थापना जानेवारी २०१० साली झाली. ही कंपनी ई-कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया करते. मुंबई, पुणे, बंगळुरु आणि हैदराबाद इथं या कंपनीच्या शाखा आहेत. एसी, फ्रिज, वॉशिग मशिन, प्रिटिंग मिशन्स, LED लॅम्प, लॅपटॉप, टलिव्हिजन, माईक्रोव्हेव अशा वस्तू रिसायकल करते.  

  • ग्रीन सोल

उदयपूरच्या श्रीयंस भंडारी आणि गढवालचे रमेश या दोघांनी Green sole नावाची कंपनी सुरू केली. त्यांचं मुख्यालय मुंबईत आहे. कंपनीचे स्वयंसेवक देशातील १५ राज्यांतील ५० मोठ्या शहरांतून जुन्या चपला- बूट जमा करत आहेत.

आम्ही आमच्या उपक्रमात दोन कंपन्यांनी सहभागी करून घेतलं आहे. Recyclekaro ही कंपनी ई-कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याच्या सुट्ट्या पार्ट्सचा पुर्नवापर करते. तर Green sole ही कंपनी जुन्या चपलांवर प्रक्रिया करून ती पुन्हा वापरण्याजोगी बनवतात. या चपलांचं गरजू मुलांना वाटप केलं जातं.

डॉ. प्रसाद मोडक

'मधली गल्ली'च्या रहिवाशांच्या स्तुत्य उपक्रमात आपणही सहभागी होऊया आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवूया. उपक्रमात सहभागी होण्यासाठी २२ नोव्हेंबर २०२० या दिवशी सहभागी व्हा.

तारीख : २२ नोव्हेंबर २०२०

स्थळ : श्रीकृपा बिल्डिंगच्या बाहेर, डॉ. मधुकर बी. राऊत रोड, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई : ४०००२८

वेळ : सकाळी १० ते ११ (रविवार)

 


हेही वाचा

नवी मुंबईत २०२१ पर्यंत उभारलं जाणार मॅनग्रोव्ह पार्क

ऑक्टोबरमध्ये मुंबई सर्वाधिक प्रदूषित

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा