Advertisement

ऑक्टोबरमध्ये मुंबई सर्वाधिक प्रदूषित

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB)नुसार ऑक्टोबर महिन्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित असल्याचं दिसून आलं.

ऑक्टोबरमध्ये मुंबई सर्वाधिक प्रदूषित
SHARES

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB)नुसार ऑक्टोबर महिन्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित असल्याचं दिसून आलं.

ऑक्टोबरमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) १४९ होता. एमपीसीबीनं २०१९ ते २०२० सालातील २० ठिकाणांचा एक महिन्याचा डेटा जाहीर केला. १०० ते २०० दरम्यानचे एक्यूआय मध्यम मानला जातो. त्यामुळे आरोग्यास कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. मात्र, ठाणे आणि डोंबिवलीसारख्या ठिकाणांनी २०० AQI इतकी नोंद केली. स्वच्छ हवेची नोंद जून २०२० मध्ये २९ AQIसह नाशिकमध्ये नोंदवण्यात आली.

यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी, मध्यरात्रीच्या सुमारास, मुंबई शहराचा एकूण एक्यूआय १५६ नोंदवला गेला. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी १८ मार्च रोजी AQI १७२ होता. दुसर्‍या दिवशी त्यात घट होईन १३० वर आला. अहवालानुसार एक्यूआय अलीकडेच ‘चांगल्या’ ते ‘समाधानकारक’ पातळीवर होता.

पूर्वी मार्चमध्ये सर्वात जास्त म्हणजे १२१ एवढा एक्यूआय नोंदवला गेला. तापमानात घट झाल्यानं आणि पावसाळ्यात घट झाली असल्यानं, एक्यूआय शहरभर वाढला आहे. अहवालानुसार वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ३०५च्या एक्यूआयसह सर्वाधिक प्रदूषित झाले होते. तथापि, ३८ च्या एक्यूआयसह वरळीची स्वच्छ हवा होती.हेही वाचा

वरळी : कचरा समुद्रात मिसळू नये म्हणून पालिका बसवतेय रेक स्क्रिन्स

मुंबईत प्रदूषण वाढलं, हवेच्या गुणवत्ता पातळीत घट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा