Advertisement

मुंबईत प्रदूषण वाढलं, हवेच्या गुणवत्ता पातळीत घट

मागील काही दिवसांत मुंबईतील प्रदूषण वाढल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यमपासून वाईट स्तरापर्यंत खाली आली आहे.

मुंबईत प्रदूषण वाढलं, हवेच्या गुणवत्ता पातळीत घट
SHARES

मागील काही दिवसांत मुंबईतील प्रदूषण वाढल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यमपासून वाईट स्तरापर्यंत खाली आली आहे.  हवेची गुणवत्ता घसरल्याने श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी तसंच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी

मुंबई आता थंडी पडू लागली असून किमान तापमान २० अंशापर्यंत खाली आहे. काही ठिकाणी आकाशात धूरमिश्रित आच्छादन दिसू लागले आहे.  दिवाळी सुरू होण्याआधीच हवेची गुणवत्ता घसरण्यास सुरुवात झाली आहे. सफरच्या आकडेवारीनुसार, शनिवारी मध्यमस्तरापर्यंत असलेली शहरातील हवेची गुणवत्ता सोमवारी वाईट स्तरापर्यंत नोंदली गेली.  

माझगावमध्ये ३०५ या अतिशय वाईट पातळीपर्यंत पोहचले होते, तर चेंबूरमध्ये २९७ आणि मालाडमध्ये २९० या वाईट पातळीपर्यंत नोंदले गेले. थंडीची सुरुवात  झाली असून येत्या काही दिवसांत थंडी वाढल्यावर हवेची गुणवत्ता आणखी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता आहे. अस्थमा किंवा दमा यांसह अन्य श्वसनाचे आजार असलेल्यांनी कोरोना साथीच्या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 



हेही वाचा -

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्रतेनं करा- पालिका आयुक्त

मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा