Advertisement

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्रतेनं करा- पालिका आयुक्त

दिवाळीसाठी खरेदीकरीता बाजारपेठांमध्ये नागरिकांची झुंबड उडू लागली असून, बहुसंख्य नागरिक मास्कविनाच सार्वजनिक ठिकाणी फिरू लागले आहेत.

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्रतेनं करा- पालिका आयुक्त
SHARES

मार्च महिन्यात मुंबईसह राज्यात प्रवेश केलेल्या कोरोनामुळं (coronavirus) सर्वच सण-उत्सव साधेपणानं साजरे करण्यात आले. अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा न करण्याच निर्णय घेतला होता. परंतू, अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. मात्र, या गणेशोत्सवानंतर मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ही वाढ लक्षात घेता, महापालिका (bmc) व राज्य सरकारनं (state government) दिवाळीनिमित्त गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनावर सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचं औषध उपलब्ध नसल्यानं मास्क घालणं, साबणानं व सॅनिटायझरचा वापर करून सतत हात स्वच्छ ठेवणे व सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करणं. या महत्वाच्या सूचना वारंवार देऊनही अनेकजण या नियमांचं पालन करत नसल्याचं निदर्शनास येत आहे.

दिवाळीसाठी (diwali) खरेदीकरीता बाजारपेठांमध्ये (market) नागरिकांची झुंबड उडू लागली असून, बहुसंख्य नागरिक मास्कविनाच सार्वजनिक ठिकाणी फिरू लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मास्कविना फिरणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाई करणारे कर्मचारी आणि पथकांच्या संख्येत वाढ करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. शिवाय, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी अत्यंत धोकादायक असल्यामुळं महापालिका अधिकारी चिंतित झाले आहेत. बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कशी नियंत्रणात आणायची, असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे. खरेदीसाठी येणारे बहुसंख्य नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. तसंच, काही जण योग्य पद्धतीनं मास्क घालत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन दंडात्मक कारवाई अधिक तीव्रतेनं करण्याचे आदेश चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आयुक्तांचे निर्देश

  • केवळ प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून चालणार नाही, तर पालिकेच्या इतर विभागांतील अधिकाऱ्यांची विभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी.
  • गर्दीची ठिकाणे निश्चित करावीत आणि तिथे कारवाई करणारी पथके तैनात करावीत.
  • संसर्ग पसरू नये या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवावी आणि वेळप्रसंगी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी.
  • जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी.
  • सर्व परिमंडळीय उपायुक्त आणि विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांनी वरील आदेशांचे प्राधान्याने काटेकोरपणे पालन करावे.
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा