Advertisement

नवी मुंबई विमानतळाजवळ शिवस्मारक, शिवमुद्रा उभारणार

सिडको मार्फत कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार यांनी दिले आहेत.

नवी मुंबई विमानतळाजवळ शिवस्मारक, शिवमुद्रा उभारणार
SHARES

नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारण्यात येणार आहे. यासाठी सिडको मार्फत कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड आशिष शेलार यांनी दिले आहेत.

मंत्रालयमध्ये अटलसेतु जवळ  शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारण्याबाबत आयोजित बैठकीत शेलार बोलत होते. यावेळी या बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ.किरण कुलकर्णी, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, सिडको आणि एमएमआरडीएचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री अॅड आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला समृध्द ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. या सांस्कृतिक वारश्याची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीच्या जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय होत आहे.  

विमानतळाकडे जगभरातील पर्यटक येतील. त्यावेळी महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कृती माहिती होण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. 

त्याचा एक भाग म्हणून अटल सेतू जवळ शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारण्याबाबत निधी मागण्याचा प्रस्ताव तयार करा असं निर्देश शेलार यांनी दिले आहे.  सिडकोने निधीमागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून मान्यता घेवून या कामाला गती द्यावी अशा सुचना त्यांनी केल्या आहेत.  

सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याच्या अनुषंगाने विविध परवानग्या विभागाने घेण्यात याव्यात असेही ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात नवी मुंबई एअर पोर्ट मार्गावर  शिवस्मारक आणि शिवमुद्रा पाहायला मिळणार आहेत.  



हेही वाचा

दादर कबुतरखाना ट्रस्टची सर्वोच्च न्यायालयात धाव

रोबोटिक वॉटर रेस्क्यू वाहने खरेदी करण्यासाठी बीएमसीची निविदा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा