Advertisement

मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणी

तसेच दि. १२ नोव्‍हेंबर २०२० रोजी खालील विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी कृपया नोंद घ्‍यावी.

मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणी
SHARES

महानगरपालिकेतर्फे १८००.मि.मी. व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीवरील सुमन नगर जंक्‍शन जवळ आढळून आलेली गळती बंद करण्‍याचे काम बुधवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील ७ प्रमुख भागात बुधवारी पाणी येणार नसल्याचे माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक लागणारे पाणी आधीच भरून ठेवल्यास त्यांची गैरसोय होणार नाही.

हेही वाचाः-ठाकरे सरकारला उशीरा जाग, एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि उचल देण्याची घोषणा

मुंबईत या पूर्वीच जुन्या झालेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींची दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार सुमन नगर जंक्‍शन येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी १८.०० मि.मी जलवाहीनीच्या दुरूस्तीचे काम बुधवारी  ११ नोव्‍हेंबर २०२० रोजी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेमध्‍ये हाती घेण्‍यात येणार आहे. यास्‍तव दि. ११ नोव्‍हेंबर २०२० रोजी खालील विभागातील नमूद केलेल्‍या परिसरामध्‍ये पाणीपुरवठा बंद राहील तसेच दि. १२ नोव्‍हेंबर २०२० रोजी खालील विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार आहे.

हेही वाचाः- महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणं किंवा आतषबाजी करण्यावर बंदी

तसेच नागरीकांना विनंती कण्यात येत आहे की, नागरिकांनी कामाच्‍या आधीच्‍या दिवशी म्‍हणजेच दि. १० नोव्‍हेंबर २०२० व दि. ११ नोव्‍हेंबर २०२० रोजी पाण्‍याचा साठा करुन ठेवावा व पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करावा. तसेच नागरिकांनी सदर दोन्‍ही दिवशी रोजी पाणी गाळून व उकळून प्‍यावे, असे ही आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्‍यात येत आहे. त्‍याचबरोबर सदर काम पूर्ण होईपर्यंत बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.

७ विभाग आणि त्यातील संबंधित परिसर यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे:-

एम पूर्व

ट्रॉंबे निम्‍नस्‍तर जलाशयावरील सी.जी. गिडवाणी मार्ग, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्ग, सह्याद्री नगर, कस्‍तुरबा नगर, अजिज बाग, अयोध्‍या नगर, म्‍हाडा कॉलनी, भारत नगर, आणिक गाव, विष्‍णू नगर, प्रयाग नगर आणि गवाण पाडा

एम पश्चिम

साई बाबा नगर, शेल कॉलनी, सिध्‍दार्थ कॉलनी, पोस्‍टल कॉलनी, एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ, बीपीटी, टाटा पावर, रामकृष्‍ण चेंबूरकर मार्गावरील मारवाली चर्च, आंबापाडा, माहूल गाव, म्‍हैसुर कॉलनी, वाशी गाव, माहूल पीएपी, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्‍मी नगर, कलेक्‍टर कॉलनी, सिंधी सोसायटी, चेंबुर कॅंम्‍प तसेच चेंबुर नाका ते सुमन नगर मधील सायन - ट्रॉबे मार्गालगतचा भाग

एफ दक्षिण

परळ गाव, शिवडी पश्चिम आणि पूर्व, हॉस्पिटल झोन, काळे वाडी

एफ उत्‍तर

कोकरी आगार, ऍन्टोपहील, वडाळा, गेट क्र. ४, कोरबा मिठागर, बीपीटी

बी विभाग

डोंगरी ए झोन, वाडी बंदर, सेंन्‍ट्रल रेल्‍वे झोन, बीपीटी झोन,

ई विभाग

डॉकयार्ड झोन, हाथीबाग व हुसैन पटेल मार्ग आणि माऊंट रोड झोन, जे.जे. हॉस्पिटल

ए विभाग

नेवल डॉक आऊटलेट झोन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा