Advertisement

नवी मुंबईत २०२१ पर्यंत उभारलं जाणार मॅनग्रोव्ह पार्क

उरण (नवी मुंबई) मध्ये असलेल्या बेलपाडा इथं २०० हेक्टर क्षेत्रात मॅनग्रोव्ह पार्क बांधण्याची योजना जाहीर केली आहे.

नवी मुंबईत २०२१ पर्यंत उभारलं जाणार मॅनग्रोव्ह पार्क
SHARES

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (JNPT) अधिकाऱ्यांनी उरण (नवी मुंबई) मध्ये असलेल्या बेलपाडा इथं २०० हेक्टर क्षेत्रात मॅनग्रोव्ह पार्क बांधण्याची योजना जाहीर केली आहे. मॅनग्रोव्ह पार्क दोन टप्प्यात विकसित होईल आणि पहिल्या टप्प्यात जून २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. उरणमधील हा पहिलाच उपक्रम असेल.

उरणच्या काही संवेदनशील झोनमध्ये डम्पिंग ग्राऊंड निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळे खारफुटीच्या झाडांना गंभीर धोका आहे. पर्यावरणप्रेमींनी या प्रदेशात मॅनग्रोव्ह पार्कसाठी बराच काळ लढा दिला. आहे. पुढे, जानेवारी २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं नियुक्त केलेली राज्य वेटलँड आणि मॅंग्रोव्ह तक्रार निवारण समितीनंही तीच सूचना दिली.

जेएनपीटीनं महाराष्ट्रातील वन विभाग महामंडळाला (एफडीसीएम) त्या जागेवर व्यवहार्यता अभ्यास करण्यास सांगितलं आहे.

या योजनेचा तपशील देताना एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक (ठाणे) कृष्णा भवर म्हणाले की, “जेएनपीटीनं सुचवलेल्या मॅनग्रोव्ह पार्कचे क्षेत्रफळ २०० हेक्टर आहे. व्यवहार्यता अहवाल सादर करण्यास आम्हाला दोन ते तीन महिने लागतील. एकदा मंजूर झाल्यानंतर, जेएनपीटीनं आम्हाला वर्क ऑर्डर दिल्यास आम्ही पार्कचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि योजना तयार करण्यास तयार आहोत. आम्ही अद्याप सामंजस्य करार (एमओयू) वर हस्ताक्षर केले नाही. आम्ही त्या जागेची दोनदा पाहणी केली आहे.”

उरणमधील मॅनग्रोव्ह पार्कच्या पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपये खर्च येईल. यात शिक्षण आणि निसर्ग व्याख्या केंद्र म्हणून काम करणार्‍या इमारती यासारख्या सुविधा देखील पुरवल्या जातील. पुढे, प्रदेशात काही दुर्मिळ प्रजातीतील खारफुटीचं प्रदर्शन देखील भरवलं जाईल.हेही वाचा

ऑक्टोबरमध्ये मुंबई सर्वाधिक प्रदूषित

मुंबई वगळता राज्यातील अनेक भागांत पुन्हा थंडी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा