मुंबई आणि नवी मुंबईतील खारफुटीवर पतंग किटकांचा हल्ला

राज्य वनविभागाच्या मॅनग्रोव्ह सेलनं म्हटलं आहे की, मुंबई आणि परिसरातील खारफुटीवर सध्या मोठ्या प्रमाणात पतंग या किटकाचे हल्ले होत आहेत. हायब्लिया पुरीया म्हणून ओळखले जाणारे हे विशिष्ट कीटक झाडांच्या सुरवातीच्या काळात झाडांना खाऊ शकतात.

असं म्हटलं जात आहे की, जवळपास ९० टक्के खारफुटीच्या झाडांवर याचा परिणाम झाला आहे. जवळपास ५ हजार हेक्टर जमीन या अंतर्गत येते. खारफुटीच्या झाडांना वाचवण्यासाठी किटकनाशक फवारणी करण्याची गरज आहे. पण ही फवारणी करणं आव्हानात्मक आहे. कारण खारफुटी झाडांना हानी पोडचू शकते.

या भागातील रहिवाशांनी सांगितलं की, यावर्षी खारफुटीच्या झाडांचं नुकसानं झाल्याचं एका मच्छिमारानं पाहिलं. आतापर्यंत तीन वेळा हल्ले झाले आहेत. इतर मच्छिमार आणि रहिवाशांनी वनविभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मॅनग्रोव्ह सेल) असलेले वीरेंद्र तिवारी यांनी पुष्टी केली की, मुंबई आणि नवी मुंबईतील सुमारे ९० टक्के खारफुटी या पतंग हल्ल्यामुळे बाधित झाली आहे.

आर राजा ऋषी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथं केलेल्या अभ्यासानुसार, पतंगांच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी कडुनिंब तेल एक उत्तम उपाय आहे. तथापि, तज्ञांनी असं म्हटलं आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणात कडुनिंबाच्या तेलाची फवारणी करणं शक्य नाही.

मुंबई मिररशी बोलताना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, मी खारफुटी सेलमधील अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालून त्याचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगू.

“पतंगांची लोकसंख्या वाढली आहे. निसर्गाचं संतुलन बिघडलं आहे. वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेच्या डी स्टालिन म्हणाले. ते हे पण म्हणाले की, ‘एव्हिसेंनिया मरीना’ म्हणून वर्गीकृत मुंबईच्या जवळपास संपूर्ण खारफुटीवर पतंग हल्ल्यांचा परिणाम होतो.


हेही वाचा

वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईला २४४ कोटींचा निधी

२०५० पर्यंत मुंबईसह 'या' ३० शहरांमध्ये जाणवेल गंभीर पाणी समस्या

पुढील बातमी
इतर बातम्या