पदपथांवर झाडं लावू नका, महापौरांचं मुंबईकरांना आवाहन

तौंते वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईत जागोजागी झाडे उन्मळून पडली. जोरदार वाऱ्याने मुंबईतील तब्बल ८१२ झाडांना गतप्राण व्हावं लागलं, यामुळे यापुढं पदपथांवर झाडे लावण्यात येऊ नये, अशी सूचना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.  

शहरात सर्वत्र भारतीय प्रजातीचीच झाडे लावण्यात यावीत, यासाठी मुंबई महापालिकेने (bmc) पुढाकार घेतलेला असून मुंबईकरांनी देखील जागोजागी भारतीय प्रजातीचीच झाडे लावावीत, असा महापालिकेचा आग्रह आहे. खासकरून पदपथांवर झाडे लावण्यात येऊ नयेत. पथपदांवर झाडे लावल्यास काँक्रिटीकरणामुळे मुळांच्या वाढीला पुरेशी जागा मिळत नाही. तसंच मुळे देखील जमिमीन निटशी रुजू शकत नाहीत. परिणामी सोसाट्याच्या वाऱ्यात अशी कमकुवत मुळं असलेली झाडं उन्मळून पडतात, अशी माहिती महापौरांनी (mumbai mayor) दिली.

चक्रीवादळामुळे शहर आणि उपनगरात उन्मळून पडलेल्या एकूण झाडांपैकी ७० टक्के झाडे ही परदेशी झाडे आहेत. राॅयल पाम, गुलमोहर, रेन ट्री अशी यापैकी काही झाडांची नावं आहेत.  महाराष्ट्र (शहर परिसर) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायदा, १९७५ नुसार झाडाच्या खोडापासून किमान १ मीटरचा परिसर हा मोकळा असला पाहिजे.

हेही वाचा- नवी मुंबईत बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

महापालिकेच्या उद्यान विभागाने २०१९ मध्ये दक्षता पथकाला पदपथांवर, रस्तेकामांवर नजर ठेवण्यास सांगितलं होतं. जेणेकरून या कायद्याची अंमलबजावणी होतेय की नाही हे कळू शकेल. मुंबईतील वृक्ष जगण्यासाठी तसंच त्यांच्या योग्य देखभालीसाठी या नियमांचं पालन होणं खूपच आवश्यक आहे.

जे वृक्ष अंशत: धोकादायक झालेले आहेत किंवा वादळामध्ये उन्मळून पडण्याची शक्यता असलेल्या वृक्षाच्या फांद्या छाटण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या कायद्यात बदल करण्याची विनंती आमच्याकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे. जेणेकरून महापालिकेला अशा वृक्षांपासून होणारा धोका कमी करता येईल, असं किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितलं. तौंते चक्रीवादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरात साधारणत: १४५४ वृक्षांच्या फांद्या देखील तुटून पडल्या होत्या. 

महाराष्ट्र (शहर परिसर) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायदा, १९७५ अंतर्गत शहरातील वृक्षाची छाटणी तसंच काढून टाकण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे.  

हेही वाचा- COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

पुढील बातमी
इतर बातम्या