Advertisement

नवी मुंबईत बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

मोरबे धरणाच्या डागडुजीबरोबरच शहरातील १११ प्रभागांतील पाणीपुरवठा करणारी यंत्रणेची देखील देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.

नवी मुंबईत बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा
SHARES

मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील मान्सुनपूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे मंगळवारी हाती घेण्यात आली. त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे  नवी मुंबई महानगरपालिका (navi mumbai municipal corporation) क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांमध्ये मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार बंद राहणार आहे. तर बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

मोरबे धरणाची शनिवारी अभियंता विभागाने पाहणी केली. या धरणावर छोटी-मोठी ७२ कामे केली जाणार आहे. त्यासाठी २५ मे रोजी एक दिवसासाठी पाणीपुरवठा बंद केला आहे. या महत्त्वाच्या कामात धरणाच्या लोखंडी दरवाजांची डागडुजी, रंगरंगोटी आणि रेडीयल प्रवेशद्वाराची दुरुस्ती ही महत्त्वाची कामे होणार आहेत. 

मोरबे धरणाच्या डागडुजीबरोबरच शहरातील १११ प्रभागांतील पाणीपुरवठा करणारी यंत्रणेची देखील देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. तसंच उच्चस्तरीय व भूमिगत जलकुंभाची पाहणी केली जाणार आहे. 

या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहणार आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे असं आवाहन पालिकेने केलं आहे. 



हेही वाचा - 

आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती

COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा