यंदा मान्सूनपूर्व पाऊसही कमी, १० जूनपर्यंत उकाडा कायम

यंदा मुंबईकरांची उकाड्यापासून लवकर सुटका होण्याची चिन्हे नाहीत. तसं बघायला गेल्यास मे महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस किंवा वळवाच्या पावसाला सुरू होते. परंतु अद्याप पावसाची कुठलीही चिन्हे नाहीत. पुढचा आठवडाभरही पाऊस येईल याची खात्री नसून १० जूननंतरच मुंबईत वळवाचा पाऊस पडू शकतो.

थेट तिसरा आठवडा

हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेटच्या मते, यंदा मुंबईत वळवाचा पाऊस कमी प्रमाणात होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यात तरी पाऊस पडण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. मुंबईत पावसाला सुरूवात थेट तिसऱ्या आठवड्यात होईल. त्यामुळे पावसाच्या सरींचा आनंद उपभोगण्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागू शकते.

भाज्या महागणार

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. २१ हजार गाव तसंच १५१ तालुके दुष्काळी म्हणून घाेषित करण्यात आले आहेत. असंख्य ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. राज्यातील धरणांमध्ये केवळ १६ टक्के पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यात तर ४ टक्केच पाणी उरलंय. शेतीला होणाऱ्या कमी पाणीपुरवठ्यामुळे भाजीपाला पिकावर त्याचा परिणाम होईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे भाज्या महागू शकतात. 


हेही वाचा-

 मिठी नदी होणार पर्यटन स्थळ, महापालिका करणार २१ कोटी खर्च

मुंबईतील महामार्ग होणार हिरवेगार


पुढील बातमी
इतर बातम्या