Advertisement

मुंबईतील महामार्ग होणार हिरवेगार

राज्यातील खासकरून मुंबईतील वाढत्या तापमानावर चिंता व्यक्त करत, शहराचं तापमान कमी करण्याच्या उद्देशाने शीख बांधवांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई तसंच मुंबईला लागून असलेल्या महामार्गाला हिरवगार करण्याचं त्यांनी ठरवलं आहे.

मुंबईतील महामार्ग होणार हिरवेगार
SHARES

राज्यातील खासकरून मुंबईतील वाढत्या तापमानावर चिंता व्यक्त करत, शहराचं तापमान कमी करण्याच्या उद्देशाने शीख बांधवांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई तसंच मुंबईला लागून असलेल्या महामार्गाला हिरवगार करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. याअंतर्गत ‘ग्रीन हायवे मिशन’ची सुरूवात करण्यात आली आहे.  

३ वर्षे देखभाल

मानखुर्द टोलनाक्याजवळ पद्मश्री संत बाबा सेवा सिंह यांच्या हातून या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्दपासून पनवेलपर्यंत ११ हजार वृक्ष लावण्यात येणार आहेत. हे वृक्ष लावल्यानंतर शीख समुदायाकडून पुढील ३ वर्षे या झाडांची देखभाल ठेवण्यात येईल.  

२५ किमी वृक्षारोपण

या उपक्रमाचे निमंत्रक बाल मलकीत सिंह म्हणाले की, गुरूनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्ताने ‘ग्रीन हायवे मिशन’ला सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये मानखुर्द ते पनवेल दरम्यान २५ किमी अंतरावर वृक्ष लावण्यात येतील. वृक्षारोपण केल्यानंतर या झाडांना जगवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील.     

पुढच्या पिढीसाठी 

रुद्र प्रतिष्ठानतर्फे ठाण्यातील येऊरमध्ये देखील वृक्षारोपण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष विनय सिंह यांनी सांगितलं, या वर्षी वाढलेल्या तापमानाने आपल्याला जाणीव करून दिली आहे की आपण मोठ्या प्रमाणावर झाडं कापून निसर्गाशी हेळसांड केली आहे. त्यामुळे सगळ्यांनी वेळेत जागं होऊन प्रत्येकी एक झाड तरी लावलं पाहिजे कारण पुढच्या पिढीला हे वृक्ष सावली देऊ शकतील.  



हेही वाचा-

आरोही ठरली अटलांटिक पार करणारी जगातील पहिली महिला

'गोदरेज प्रॉपर्टीज'ने विकत घेतला आर.के, स्टुडिओ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा