बदलत्या वातावरणाचा फटका मुंबईला (Mumbai) बसला असून, मुंबई हे राज्याभरातील सर्वात प्रदूषित शहर (most polluted city) म्हणून गणलं गेलं आहे. भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरं हवा गुणवत्तेच्या (Air quality) बाबतीत धोक्याच्या पातळीत आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. ग्रीनपीस इंडिया (Greenpeace India) या पर्यावरण संस्थेच्या (Environmental Institute) वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल (Environmental Reports) सादर केला जातो. यंदीही या संस्थेच्या वतीनं अहवाल सादर करण्यात आला असून, यामध्ये ही माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा ३ पटीनं खालावला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात पीएम १० घटकांचं वाढतं प्रमाण कारणीभूत आहे. हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरलं आहे. या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation) हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा ८ पट अधिक आहे.
मुंबईतील वाढती वाहतूक, वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळं प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचं अहवालातून दिसून येत आहे. सुमारे वर्षभरापूर्वी राज्यातील हवेच्या प्रदूषणाच्या अहवालातही मुंबईतील हवेत पीएम घटक आणि नायट्रोजन ऑक्सॉईडच्या (Nitrogen oxide) उत्सर्जनात वाढ झाल्याचं आढळून आलं होतं.
जानेवारी २०१९ मध्ये भारतासाठी पहिला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (National Clean Air Program) जाहीर करण्यात आला. याअंतर्गत २०१७ पासून २०२४ पर्यंत शहरातील वायू प्रदूषणाचं (Air pollution) प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. या प्रत्येक शहरासाठी कृती आराखडा (Plan of action) तयार करण्यात आला आहे.
अतिप्रदूषित शहरं
हेही वाचा -
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही
Kala Ghoda Festival 2020 : खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यास न्यायालयाची मनाई