१९ आणि २० तारखेला अतिवृष्टीचा इशारा, मुंबईकरांनो हवामान खात्याचे 'हे' ५ इशारे लक्षात ठेवा

मुंबईसह रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर गुरुवारी आणि शुक्रवारी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं १९ सप्टेंबर या दिवशी रेड अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याबाबत ५ महत्त्वाचे मुद्दे...

) हवामान खात्यानुसार मुंबईसोबतच पालघर, वाशी, ठाणे, खारघर, रायगड, नेरुल, पनवेल, बदलापूर आणि जवळपासच्या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे

) बुधवारी रात्रीपासूनच काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. बुधवारी दिवसभर आणि रात्री ३८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

) पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रिपोर्टनुसार, मुंबईत यावर्षी संपूर्ण मोसमातील (जून ते सप्टेंबर) एकूण पावसाचं प्रमाण गेल्या सत्तर वर्षांतील सर्वाधिक नोंदीच्या जवळ पोहोचलं आहे. पुढील दोन आठवड्यांत हा आकडा ओलांडून मोसमातील सर्वाधिक पावसाची नवी नोंद या वर्षी होण्याची शक्यता आहे.

) पावसात मुंबईची तुंबई होणं, ट्रॅफिक जाम होणं हे काही नवीन नाही. मुंबईत मुसळधार पाऊस झाला की पाणी भरतं. त्यानंतर ट्रेन आणि विमान सेवेवर परिणाम होतो. यामुळे पालिकेनं ट्वीट करत गुरुवारी आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडा असा इशारा दिला आहे.

) हवामान खात्यानं दिलेला इशार लक्षात घेता मुंबई आणि ठाणे परिसरातील सरकारी आणि खाजगी शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. शाळाच नाही तर कॉलेज देखील बंद ठेवण्यात आली आहेत.

) समुद्रावर ताशी ६५ किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत उत्तर कोकणातील किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तर गुरुवार आणि शनिवार या काळात दक्षिण कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणं धोकादायक असेल

) मुंबईकर पावसाचा आनंद लुटण्यासाठी समुद्र किनारी जातात. त्यामुळे फक्त मच्छिमारांनाच नाही तर मुंबईकरांना देखील समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे


हेही वाचा -

रेड अलर्टमुळं मुंबई-ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर

महापालिकेने वर्षभरात मुंबईत लावली ‘इतकी’ झाडं, आकडेवारी आली समोर

पुढील बातमी
इतर बातम्या