आख्खी मुंबई शिजून निघतेय! नक्की होतंय काय?

गेल्या दोन दिवसात मुंबईचा पारा कमालीचा वाढला आहे. उष्णतेच्या लाटेत मुंबईकर चांगलेच होरपळले आहेत. कुलाबा वेधशाळेनं रविवारी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस नोंदवलं आहे. गेल्या १० वर्षांमध्ये दुसऱ्यांदा एवढ्या उच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढलेलं तापमान आणि प्रचंड आर्द्रता यामुळे रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही झाली.

पुढचे २४ तास मुंबईत पारा वाढण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. पूर्वेकडून जमिनीवरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात अचानक वाढ झाली आहे. मुंबईतील सरासरी ७९ ते ९० टक्क्यांवर गेलेली आर्द्रता आणि समुद्रावरून दुपारच्या वेळेस येणारे खारे वारे उशीरानं वाहत आहेत. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

२५ मार्च, २०१८ - ४१ अंश सेल्सिअस

१७ मार्च, २०११ - ४१.३ अंश सेल्सिअस

२८ मार्च, १९५६ - ४१.७ अंश सेल्सिअस (आत्तापर्यंतचं उच्चतम तापमान)

यापूर्वी २०११ साली मुंबईतील तापमान ४१.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर ६२ वर्षांपूर्वी २८ मार्च १९५६ साली मुंबईतील कमाल तापमान ४१.७ वर गेले होते.


हेही वाचा

उन्हाळ्यातल्या विकारांपासून दूर राहाण्यासाठी 'सब्जा' घ्याच!

पुढील बातमी
इतर बातम्या