नोव्हेंबर संपत आला तरी मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा कायम

दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पंधरवड्यात मुंबईकरांना थंडीची चाहुल लागते. परंतु, यंदा नोव्हेंबर महिना संपत आला तरी मुंबईकर थंडीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, मुंबई वगळता राज्याच्या इतर भागातील तापमानात घट होत आहे. पश्चिम हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांमधून थंड वाऱ्याचा प्रवाह उत्तर मैदानावर पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळं तापमान कमी होत असून, अनेक भागातील किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे.

हवामानात बदल

सततच्या हवामान बदलामुळं मंगळवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

हवामान कोरडं

२० ते २२ नोव्हेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार आहे. १९ आणि २० नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

राज्यातील किमान तापमान

  • उस्मानाबाद - १३.४

  • नाशिक - १४.८

  • जळगाव - १५

  • परभणी - १५.५

  • बारामती - १७

  • नांदेड - १८.१

  • सोलापूर - १८.६

  • सांगली - १९.६

  • कोल्हापूर - २०.३

  • माथेरान - २०.४

  • सांताक्रुझ - २४

मुंबईतील हवेची गुणवत्ता

  • बोरीवली : १२४ मध्यम

  • मालाड : १२१ मध्यम

  • भांडुप : ६४ समाधानकारक

  • अंधेरी : ९७ समाधानकारक

  • बीकेसी : १९५ मध्यम

  • चेंबूर : ६८ समाधानकारक

  • वरळी : ९६ समाधानकारक

  • माझगाव : ९९ समाधानकारक


हेही वाचा -

पालिकेला खड्डे दाखवून त्याने कमावले ५ हजार रुपये

'या' कारणामुळं ५ दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प


पुढील बातमी
इतर बातम्या