Advertisement

पालिकेला खड्डे दाखवून त्याने कमावले ५ हजार रुपये

दुचाकीवरून शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तर सिद्धिविनायक मंदिरापासून ते धारावीपर्यंत प्रवास करत साडेचार तास खर्च करून त्याने या तक्रारी केल्या.

पालिकेला खड्डे दाखवून त्याने कमावले ५ हजार रुपये
SHARES

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा कोट्यावधी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. मात्र तरी ही दरवर्षीय पावसाळ्यात मुंबईचे रस्ते खड्डेमय पहायला मिळतात. या खड्ड्यांमुळे कित्येक अपघात घडले, अनेकांचा जीव गेला. याबाबत जनतेच्या वाढत्या रोषामुळे महापालिकेकडून मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी 'पॉटहोल चॅलेंज' सुरु केले. या योजनेला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, दादरमधील एका तरुणाने पालिकेच्या या योजनेनुसार ५० तक्रारी नोंदवत तब्बल ५ हजार रुपये कमावले आहेत.

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राहणारा प्रथमेश चव्हाण बालमोहन विद्यामंदीर शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या प्रथमेश यूपीएसी,एमपीएसीच्या परीक्षांचा अभ्यास करतोय, पालिकेने जाहीर केलेल्या मोहिमेत त्याने सहभाग घेण्याचे ठरवले. एक संपूर्ण दिवस त्याने खड्डय़ांच्या तक्रारींसाठी खर्च केला. दुचाकीवरून शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तर सिद्धिविनायक मंदिरापासून ते धारावीपर्यंत प्रवास करत साडेचार तास खर्च करून त्याने या तक्रारी केल्या. त्याला साने गुरुजी शाळेजवळ, शिवाजी पार्क परिसर आणि सिद्धिविनायक मंदिराच्या आतील रस्त्यांवर खूप मोठया प्रमाणावर खड्डे आढळले. त्याचे फोटो काढून त्याने पालिकेने दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड केले. महापालिकेच्या नियमांनुसार, खड्ड्याची तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत ते बुजवणे आवश्यक होतं. अन्यथा तक्रारदाराला ५०० रुपये बक्षीस द्यावं लागणार होतं. प्रथमेशने दाखवलेले १० खड्डे बीएमसीने २४ तासांच्या आत बुजवले. मात्र अन्य खड्डे बुजवता न आल्याने, महापालिकेला त्याला ५ हजार रुपयांचं बक्षीस द्यावं लागलं.

खड्डे दाखवा आणि ५०० रुपयांचं बक्षीस मिळवा ही मोहीम मुंबई महापालिकेने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राबवली. खड्डे दाखवल्यानंतर ते २४ तासांच्या आत बुजवावे लागणार होते, अन्यथा अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या खिशातून बक्षीसाची रक्कम दिली जाणार होती. या मोहिमेदरम्यान मुंबई महापालिकेकडे जवळपास दीड हजाराहून अधिक तक्रारी दाखल झाल्या. तक्रारदारांनी दाखवलेले बहुतेक खड्डे २४ तासांच्या आत बुजवण्यात आले. मात्र काही खड्डे २४ तासांच्या आत बुजवणे पालिकेला जमले नाही. त्यामुळे १५५ जणांना बक्षीस द्यावे लागले. एक व्यक्ती केवळ दोनच तक्रारी करु शकेल अशी अट महापालिकेची होती. मात्र प्रथमेशने त्याला आव्हान देत ५० तक्रारी दाखल केल्या. त्याने केलेल्या तक्रारीनंतर बहुतेक खड्डे बुजवण्यात आले. मात्र १० खड्डे बुजवू न शकल्याने महापालिकेला प्रथमेशला ५ हजार रुपये द्यावे लागले.

संबंधित विषय