कांजूरमार्ग मेट्रो कारशेडमुळे १५८० कोटी रुपये वाचणार, समितीचा अहवाल

मेट्रो ३ चे कारशेड आरेमध्ये उभारायचे की कांजुरमार्गमध्ये यावरून वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता कांजुरमार्ग मेट्रो कारशेडमुळे राज्याचे १५८० कोटी रुपये वाचवणार आहे.  नऊ सदस्यीय समितीच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. 

मेट्रो कारशेडच्या अभ्यासासाठी राज्य सरकारनं राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती स्थापन केली होती. कांजुरमार्गच्या जागेत कारशेड उभारल्यास जागेची किंमत आणि बांधकाम खर्च यामध्ये राज्याचे १५८० कोटी रुपये वाचतील, असं या समितीनं अहवालात म्हटलं आहे. 

अहवालात म्हटलं की,  आरे येथील जागेपेक्षा कांजुरमार्ग येथील जागा अधिक मोठी आहे. आरेच्या कारशेडमध्ये केवळ ३० मेट्रो उभ्या राहू शकतात. तर कांजुरमार्ग येथील जागेत ५५ मेट्रो उभ्या राहू शकतात.

महाविकास आघाडी सरकारनं मेट्रो कारशेडसाठी आरेऐवजी कांजूर येथील जागा निश्चित केली होती. मात्र, कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 


हेही वाचा -

नोकरी पाहिजे? मग 'या' WhatsApp नंबरवर 'Hi' पाठवा

शाळा, महाविद्यालयांच्या मैदानाचा वाहन प्रशिक्षणासाठी होणार वापर?


पुढील बातमी
इतर बातम्या