थोड्याच वेळात पृथ्वी जाणार अंधारात...

  • मुंबई लाइव्ह टीम & मानसी बेंडके
  • पर्यावरण

नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरिक्त वापर, एसी, वाहनांमुळे हानीकारक वायूचं वातावरणात सातत्यानं होणारं उत्सर्जन, वीजेचा वाढलेला वापर यामुळे पृथ्वीच्या तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. पृथ्वीसाठीच नव्हे, तर मनुष्यजातीसाठी घातक ठरणाऱ्या या प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने २४ मार्च रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री ८.३० ते ९.३० दरम्यान जगभरात 'अर्थ अवर' पाळण्यात येणार आहे. याद्वारे पृथ्वीला वाचवण्यासाठी करायचा उपाययोजनांकरीता जनजागृती करण्यात येणार आहे.  

'वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड' या संस्थेच्या माध्यमातून ८.३० ते ९.३० या वेळेत दिवे बंद करण्याचं आवाहन जागतिक स्तरावर करण्यात आलं आहे. या वेळेत घर, परिसर, कार्यालये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांवरील दिवे बंद करून त्याऐवजी मेणबत्तीच्या उजेडाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. १ तास दिवे बंद ठेवून अनावश्यक वीजवापर टाळावा हे नागरिकांना सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे.

'वर्ल्ड वाइव्ड लाइफ फंड' आणि 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड' यांच्या सौजन्यानं २००७ साली ऑस्ट्रेलियामधील सिडनी इथं हवामान बदल विषयावर जनजागृती अभियानाच्या निमित्तानं पहिला 'अर्थ अवर' साजरा करण्यात आला'अर्थ अवर'च्या निमित्तानं मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत एक तास दिवे बंद ठेवण्यात आले. पहिल्याच प्रयोगात सिडनीमधील २.२ दशलक्ष जनता सहभागी झालीशिवाय उद्योगधंदे, संस्था,विद्यापीठांनीही या चळवळीत सहभाग घेतलाएक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना २००८ साली जगभर हा प्रयोग राबवण्यात आला

१७८ देशांमध्ये दरवर्षी ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी वारंवार आवाहन केलं जातं. गेल्या वर्षी मुंबईतल्या सीएसटीएम स्टेशनवरील दिवे बंद ठेवण्यात आले होते. सीएसटीएमसोबतच राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, लाल किल्ला आणि चारमिनारवरील दिवे देखील बंद ठेवण्यात येणार आहे


हेही वाचा

२० वर्षांनंतर वर्सोवा बीचवर आले 'ऑलिव्ह रिडले'!

पुढील बातमी
इतर बातम्या