मुंबईत ८ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता

ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसानं सप्टेंबर महिन्यात पुन्हा दमदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळं मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक ठप्प होती. तसंच, रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे वाहतूकही ठप्प होती. त्यामुळं प्रवाशांसह पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. परंतु, पुढील आणखी काही दिवस मुंबईकरांना पावसाचा सामना करावा लागणार आहे. 

पावसाची विश्रांती

मुंबईसह उपनगरात मागील २४ तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं विश्रांती घेतली आहे. दरम्यान, गुरूवारी संपुर्ण दिवसात ७२ मिमी पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेनं केली आहे. तसंच, ४१ मिमी पावसाची नोंद सांताक्रुझ वेधशाळेनं केली आहे. 

पुन्हा जोरदार पाऊस

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ सप्टेंबर रोजी मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 


हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: मध्य रेल्वेच्या २० विशेष लोकल

प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, लेखक किरण नगरकर यांचं निधन


पुढील बातमी
इतर बातम्या