Advertisement

गणेशोत्सव २०१९: मध्य रेल्वेच्या २० विशेष लोकल

७ व ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री आणि १२ व १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री मध्य रेल्वेनं एकूण २० विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव २०१९: मध्य रेल्वेच्या २० विशेष लोकल
SHARES

गणेशोत्सवानिमित्त रात्री उशिरा बाप्पाचं दर्शन घेणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं खुशखबर दिली आहे. ७ ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री आणि १२ व १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री मध्य रेल्वेनं एकूण २० विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर धावणार आहेत. तसंच या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

बाप्पाचं दर्शन

सरकारी आणि खासगी कार्यालये गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जन वगळता अन्य दिवस सुरू असतात. त्यामुळं या गणेश भक्तांना आपल्या कुटुंबीयांसमवेत बाप्पाच्या दर्शनासाठी रात्री उशिरा बाहेर पडावं लागतं. तसंच, रविवारी सुट्टी असल्यानं शनिवारी रात्री बहुतांश मुंबईकर दर्शनासाठी घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं संभाव्य गर्दी लक्षात घेता अतिरिक्त लोकल चालवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

विशेष लोकल

रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांसाठी सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं  दिली आहे.



हेही वाचा -

प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, लेखक किरण नगरकर यांचं निधन

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली पदाची शपथ




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा