कल्याणमध्ये सापडला दुर्मिळ दुतोंडी साप

कल्याणच्या गंधारे परिसरात राहणाऱ्या डिंपल शहा यांच्या ऋतु रिव्हर्स बिल्डींगच्या गेटजवळ सापाचे पिल्लू आढळून आले. त्यांनी तात्काळ वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशनच्या टिमला संपर्क केला. त्यानंतर सर्पमित्र निलेश नवसरे आणि प्रेम आहेर यांनी घटनास्थळी जाऊन त्या सापाचा सुखरूप बचाव केला. सापाला पकडताच त्यांचा कळालं की, हा दोन तोंडी दुर्मिळ घोणस साप आहे. 

यापूर्वी याच परिसरात अशाप्रकारचा साप आढळला होता. २० सप्टेंबर २०१९ रोजी गंधारे परिसरात दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस वाॅर रेस्क्यू फाॅऊडेशनच्या टिमनं बचाव केल्याची नोंद वनविभागाकडे आहे. 

त्यावेळी त्या सापाला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूट इथं संशोधन कार्यासाठी ताब्यात दिलं होतं. परंतु, संशोधन सुरू असताना सदर सापाचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात दुसऱ्यांदा या दोन तोंडाच्या घोणस सापाला जिवदान देण्यात सर्पमित्रांना यश मिळाल्याचं वाॅर रेस्क्यू टिमचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगितलं. 

गतवर्षी हाफकिन संस्थेचे संशोधन कार्य अपूर्ण राहिले होते. दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस सापाचा शास्त्रीय अभ्यास आणि नव्याने नोंद करून वनविभागाचे उप वनसंरक्षक श्री जितेंद्र रामगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती वाघेरे यांच्या आदेश येईपर्यंत याचा संभाळ करण्यात येईल. 

दुर्मिळ घोणस साप एकाच परिसरात आढळल्याने त्या जागेबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनेची जागतीक स्तरावर नोंद करून सरिसृप संशोधन पपत्र ( Reptiles Rescerch Paper) जाहीर करणार असल्याचं वन्यजीव अभ्यासक आणि वाॅर रेस्क्यू टिमचे सचिव सुहास पवार यांनी सांगितलं.


हेही वाचा

तेजस ठाकरे यांच्या सह ४ तरुणांनी लावला नव्या पालीच्या प्रजातीचा शोध

पुढील बातमी
इतर बातम्या