Advertisement

तेजस ठाकरे यांच्या सह ४ तरुणांनी लावला नव्या पालीच्या प्रजातीचा शोध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलानं तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमनं पालींच्या (New Gecko Species) या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे

तेजस ठाकरे यांच्या सह ४ तरुणांनी लावला नव्या पालीच्या प्रजातीचा शोध
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांनी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला आहे. तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकरांच्या टीमनं पालींच्या (New Gecko Species) या दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे.

कर्नाटकातील सकलेशपूरच्या उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. भारतात वेगवेगळ्या पन्नास पालींच्या प्रजाती आढळतात. त्यात आता डोळ्यांच्या गोलाकार मोठ्या बुबळांच्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीररचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत.

दुर्मिळ पालीचं नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ (Magnificent Dwarf Gecko) असं ठेवण्यात आलं आहे. या चारही तरुणांच्या संशोधक टीमने या नव्या प्रजातींच्या पालीवर केलेला शोधनिबंध आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या “झुटाक्सा” या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे (Tejas Thackeray Team Discovered New Gecko Species).

तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी २०१४ मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता. मात्र, गेली पाच वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींवर जुणूकीय तसंच इतर पालींपैक्षा या वेगळ्या का आहेत यावर प्राणी शरीर शास्त्रांच्या नियमानुसार अनेक सविस्तर संशोधन करण्यात आलं.

गेल्या ९ महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात तेजस ठाकरेंनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ (Snake Boiga Thackeray) असं ठेवण्यात आलं होतं.



हेही वाचा

बोरीवलीचं संजय गांधी पार्क खुलं करा, माॅर्निंग वाॅकर्सची मागणी

सावधान! पर्यावरणात होतील 'हे' भयंकर बदल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा