Advertisement

सावधान! पर्यावरणात होतील 'हे' भयंकर बदल

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजीनं हा अहवाल तयार केला आहे.

सावधान! पर्यावरणात होतील 'हे' भयंकर बदल
SHARES

हवामान बदलाविषयीचा (Climate Changes) भारतातील पहिला अहवाल नुकताच सादर करण्यात आला. यात २१०० सालापर्यंत देशाचे सरासरी तापमान (Temperature)  ४.४ अंशांपर्यंत वाढेल. तर उष्णतेच्या (Heat) लाटांची तीव्रता तीन ते चारपटीनं वाढेल. तसेच समुद्रातील पाणीपातळीही (Sea Water lavel) १ फूट वाढणार आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. ‘असेसमेंट ऑफ क्लायमेट चेंज ओव्हर द इंडियन रिजन’ हा अहवाल विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरोलॉजीनं हा अहवाल तयार केला आहे. अहवालाचे दर चार ते पाच वर्षांनी परीक्षण केलं जाईल. अहवालानुसार, १९८६ पासून ते २०१५ दरम्यान सर्वात उष्ण दिवसाच्या (कमाल) आणि सर्वात थंड दिवसाच्या (किमान) तापमानात (Mumbai Weather) अनुक्रमे ०.६३ अंश आणि ०.४ अंश वाढ झाली आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास १९७६ ते २००५ च्या तुलनेत २१०० सालापर्यंत यात ५५ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढ होईल.

याचा अर्थ असा की, शतकाच्या शेवटपर्यंत या दोन्ही तापमानात अनुक्रमे ४.७ आणि ५.५ अंश वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन घटवण्यासाठी कोणतंही पाऊल उचललं नाही तर परिस्थिती अशीच राहण्याचा अर्थ आहे. १९५१ ते २०१५ दरम्यान मोसमी पाऊस ६% घटला आहे.

विशेषत: गंगेच्या मैदानी प्रदेशात आणि पश्चिम घाट भागात पाऊस (Mumbai Rain)जास्त घटला आहे. मध्य भारतात अतिवृष्टीचे प्रमाण ७५ % वाढले आहे. १९५१ पासून ते १९८० च्या तुलनेत १९८१ ते २०११ मध्ये दुष्काळाच्या प्रमाणात २७ टक्के वाढ झाली आहे. अहवालात मुंबई, कोलकातासारख्या महानगरांत पुरासाठी हवामान बदल, शहरीकरण, समुद्रातील पाणीपातळी वाढणं कारणीभूत असल्याचं नमूद आहे. मध्य भारतातील ओलसर क्षेत्राचं आता दुष्काळग्रस्त भागात रूपांतर झालं आहे. अहवालानुसार, पू्र्व किनारपट्टी, प.बंगाल, गुजरात, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये पुराचा धोका वाढला आहे.

देशातील वातावरणात वेगानं होणाऱ्या बदलाचा परिणाम इकोसिस्टिम, शेतीतील उत्पादन, ताज्या पाण्याच्या स्रोतावर जास्त होईल. तसंच पायाभूत सुविधाही नष्ट होतील. यामुळे देशातील जैवविविधता, खाद्य, पाणी, ऊर्जा संरक्षण आणि आरोग्यावर वाईट परिणाम होईल. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे उष्माघात, हृदय व मज्जासंस्थेशी संबंधित आजार आणि मानसिक विकार वाढतील.



हेही वाचा

'निसर्ग' खवळला! जाणून घ्या रेड, ग्रीन, ऑरेंज अलर्टचा अर्थ

चक्क मुंबईत गुलाबी पाण्याचं तळं! जाणून घ्या यामागील रहस्य

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा